Share Market Opening Bell: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ दरांमध्ये 90 दिवसांची सवलत दिल्याचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, बीएसई सेन्सेक्स 988.34 अंकांनी वाढून 74,835.49 अंकांवर आणि एनएसई निफ्टी 50 निर्देशांक 296.25 अंकांनी वाढून 22,695.40 अंकांवर उघडला. या आठवड्यात भारतीय बाजारात खूप चढ-उतार आले आहेत. या आठवड्यात सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर, मंगळवारी बाजारात सुधारणा दिसून आली. पण बुधवारी बाजारात पुन्हा एकदा घसरण झाली. तथापी, महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी शेअर बाजार बंद होता.
हेही वाचा - रेपो रेटमध्ये कपात; सर्वसामान्यांना मोठा दिलासा; गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता
ट्रम्प टॅरिफचा शेअर मार्केटवर परिणाम -
निफ्टी 50 वर सिप्ला, टाटा मोटर्स, सन फार्मा, टाटा स्टील, हिंडाल्को यांनी सर्वाधिक वाढ नोंदवली. गुरुवारी ट्रम्प यांनी पुढील तीन महिन्यांसाठी भारतासह जवळजवळ सर्व देशांवर जकातींवर बंदी घातली. ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतलेल्या यू-टर्नमुळे बुधवारी अमेरिकन बाजारपेठेत 8-12 टक्क्यांची ऐतिहासिक वाढ झाली.
हेही वाचा - सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
शुक्रवारी, सेन्सेक्समधील 30 पैकी 28 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात उघडले, तर उर्वरित 2 कंपन्यांचे शेअर्स तोट्यासह लाल रंगात उघडले. दुसरीकडे, निफ्टी 50 च्या सर्व 50 कंपन्यांचे शेअर्स तेजीसह हिरव्या चिन्हावर व्यवहार करू लागले. आज, सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, सन फार्माचे शेअर्स सर्वाधिक 4.80 टक्के वाढीसह उघडले आणि टीसीएसचे शेअर्स सर्वाधिक 0.10 टक्के घसरणीसह उघडले. तथापी, आज शुक्रवारी एनटीपीसी, नेस्ले इंडिया, कोटक महिंद्रा बँक, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, एशियन पेंट्स आणि अॅक्सिस बँकेचे शेअर्सही वाढीसह उघडले.
Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!