Viral Video : केरळमधील कोझिकोडमध्ये एका वृद्ध महिलेने दाखवलेल्या धाडसाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. ट्रॅफिक टाळण्यासाठी फूटपाथचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वाराला या महिलेने एकटीने रोखून धरले आणि त्याला रस्त्यावर परत जाण्यास भाग पाडले. नागरी हक्कांच्या जाणीवेचा अभाव असलेल्या काळात या महिलेने दिलेला हा धडा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
फूटपाथवर अडून बसल्या आजी
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, कोझिकोडमधील एरनहिपलम सिग्नलजवळ ट्रॅफिक जॅम असल्याने अनेक दुचाकीस्वार फूटपाथवरून वाहने नेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, एका वृद्ध महिलेने या अतिक्रमणाविरुद्ध ठाम भूमिका घेतली. एक दुचाकीस्वार त्यांच्या जवळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्या फूटपाथच्या मध्यभागी उभ्या राहिल्या. चालकाने विरोध करूनही त्यांनी जागा सोडली नाही आणि त्याला मागे हटण्यास भाग पाडले. यावेळी त्यांनी आपला फोन काढून चालकाचा नियमभंग कॅमेऱ्यात कैद करण्याचा प्रयत्नही केला.
सोशल मीडियावर 2.1 कोटींहून अधिक व्ह्यूज
हा व्हिडिओ '@aflu_stories_' नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्याला आतापर्यंत 2.1 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "फूटपाथवर वृद्ध आणि मुले चालत असतात, तिथे बाईक चालवणे अपघाताला निमंत्रण देणारे आहे. या महिलेला सलाम!" नेटकऱ्यांनी या महिलेचे वर्णन 'खरी फायटर' असे केले असून, अनेकांनी त्यांच्या शिस्तीचे आणि धैर्याचे कौतुक केले आहे.
हेही वाचा - Plane Crash Pilot Massage: विमान कोसळण्यापूर्वी पायलटचा 'तो' अखेरचा संदेश! "माझ्या पत्नीला सांगा, मी तिच्यावर.."
कमेंट्स विभागात एका वापरकर्त्याने ही महिला आपली 'हॉस्टेल वॉर्डन' असल्याचे सांगितले. त्या कडक शिस्तीच्या असल्या तरी अत्यंत काळजी घेणाऱ्या आहेत, अशा भावना या विद्यार्थ्याने व्यक्त केल्या आहेत. ट्रॅफिक पोलिसांनी जे करणे अपेक्षित होते, ते काम या वृद्ध महिलेने अत्यंत प्रभावीपणे केल्याचे मत अनेक सोशल