Tuesday, November 18, 2025 03:46:25 AM

West Bengal: दुर्गापूर हादरलं! वैद्यकीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; नराधमाने जंगलात ओढत नेऊन केलं घृणास्पद कृत्य

घटनेनंतर तातडीने न्यू टाउनशिप पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे.

west bengal दुर्गापूर हादरलं वैद्यकीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार नराधमाने जंगलात ओढत नेऊन केलं घृणास्पद कृत्य

West Bengal: पश्चिम बंगालमधील दुर्गापूरमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दुसऱ्या राज्यातील एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात लैंगित अत्याचार करण्यात आला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे शहरात व्यापक संताप आणि तणाव निर्माण झाला आहे. घटनेनंतर तातडीने न्यू टाउनशिप पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरु केला आहे. तथापी या घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीचे कुटुंबीय ओडिशा येथून दुर्गापूरला रवाना झाले आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी आपल्या सहकारी विद्यार्थिनीसोबत जेवण्यासाठी कॅम्पस बाहेर गेली होती. काही वेळाने तिचा वर्गमित्र तिथे पोहोचला. त्याच क्षणी पाच तरुण आले आणि त्यांना थांबवले. त्यांनी वैद्यकीय विद्यार्थिनीकडून पैसे मागितले. तिने पैसे देण्यास नकार दिल्याने तिचा मोबाईल फोन हिसकावून घेण्यात आला. दरम्यान, विद्यार्थिनीचा साथीदार घटनास्थळावरून निघून गेला. यानंतर, तरुणांनी विद्यार्थिनीला रस्त्यापासून जवळच्या जंगलात जबरदस्तीने ओढून नेले, जिथे त्यांच्यापैकी एकाने तिच्यावर लैंगित अत्याचार केला. काही वेळानंतर, तिचा वर्गमित्र तिथे आला. त्याने तिला वाचवले आणि तिला पुन्हा कॉलेजमध्ये आणले. विद्यार्थिनीला ताबडतोब त्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने न्यू टाउनशिप पोलीस स्टेशनला घटनेची माहिती दिली. पीडितेच्या वर्गमित्राने फोन करून तिच्या कुटुंबाला माहिती दिली, त्यानंतर ते रात्री दुर्गापूर येथे आले.  

हेही वाचा - Rajasthan Shocker : हृदयद्रावक घटना! पती-पत्नीच्या वादाची मुलांना शिक्षा; आईनं 4 मुलांसह केलं विष प्राशन, अन्...

दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी ज्या सहकारी विद्यार्थिनीसोबत त्यांची मुलगी कॅम्पसबाहेर गेली होती तिच्या भूमिकेबद्दल गंभीर शंका व्यक्त केली आहे. त्यांचा दावा आहे की घटनेच्या वेळी विद्यार्थ्याने आपल्या वर्गमैत्रिणीला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. घटनेची माहिती मिळताच न्यू टाउनशिप पोलीस स्टेशनचे पोलिस रुग्णालयात पोहोचले. तथापि, पोलीस किंवा मेडिकल कॉलेज प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पोलिसांनी फक्त एवढेच सांगितले की, तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे. तथापी, ज्या वर्गमैत्रिणीसोबत विद्यार्थिनी रुग्णालयातून निघून गेली होती तिची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा - Coldriff Cough Syrup : 'कोल्ड्रिफ' बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाचा न्यायालयात 'अजब' दावा; म्हणे, 'अनेक वर्षांपासून उत्पादन सुरू, मात्र कधीही कोणी...'

पीडितेच्या वडिलांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले की, मी माझ्या मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी दुर्गापूरला पाठवले होते. तिच्यासोबत असे घृणास्पद कृत्य घडेल असे मला कधीच वाटले नव्हते. सध्याची परिस्थिती पाहता, मी मुलीला येथे शिक्षणासाठी ठेवणार नाही. 

राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल - 

राष्ट्रीय महिला आयोगानेही या घटनेची दखल घेतली आहे. आयोगाचे एक पथक पीडितेला भेटण्यासाठी आणि या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी दुर्गापूरला येत आहे. ऑगस्ट 2024 मध्ये कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका तरुण वैद्यकीय विद्यार्थीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. या घटनेमुळे राज्यभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. दुर्गापूरमधील या घटनेने पुन्हा एकदा त्या दुःखद घटनेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 


सम्बन्धित सामग्री