Sunday, November 16, 2025 06:18:04 PM

Cyber Fraud Case : गुजरातमध्ये ED ची मोठी कारवाई!; 100 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूकप्रकरणात 4 आरोपींना अटक

आरोपींनी सायबर फसवणुकीद्वारे 100 कोटींहून अधिक बेकायदेशीर पैसे कमावले आहेत.

cyber fraud case  गुजरातमध्ये ed ची मोठी कारवाई 100 कोटी रुपयांच्या सायबर फसवणूकप्रकरणात 4 आरोपींना अटक

Cyber Fraud Case: गुजरातमध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) एका मोठ्या सायबर फसवणूक आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे. तपासात आढळून आले की, या आरोपींनी सायबर फसवणुकीद्वारे 100 कोटींहून अधिक बेकायदेशीर पैसे कमावले आहेत. ही कारवाई 15 ऑक्टोबर 2024 रोजी सुरत पोलिसांच्या विशेष ऑपरेशन्स ग्रुपद्वारे दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे सुरू करण्यात आली. संघीय तपास संस्थेच्या सुरत उप-क्षेत्रीय कार्यालयाने मकबुल अब्दुल रहमान डॉक्टर, काशिफ मकबुल डॉक्टर, महेश मफतलाल देसाई आणि ओम राजेंद्र पंड्या यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार ताब्यात घेतले आहे. 

हेही वाचा - Shocking : 55 वर्षांच्या महिलेने 17 वर्षांच्या मुलाशी केलं बळजबरीने लग्न; मुलगा आणि जावयाच्या मदतीने बेदम मारहाण

तपासात उघडकीस आले सत्य 

तपासात असे दिसून आले की मकबूल डॉक्टर, त्यांचा मुलगा काशिफ, बसम मकबूल आणि महेश देसाई यांनी डिजिटल अटक, फॉरेक्स ट्रेडिंग आणि बनावट ईडी तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नोटिसांचा वापर करून विविध सायबर फसवणुकीत सहभाग घेतला. अनेक लोक ऑनलाइन फसवणुकीला बळी पडले.

बनावट बँक खाती आणि सिम कार्ड वापर 

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर बनावट बँक खाती उघडली आणि त्यात फसवणूक केलेले पैसे जमा केले. नंतर प्री-अॅक्टिव्हेटेड सिम कार्डचा वापर करून या खात्यांचा व्यवहार करण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा - Sambhajinagar Crime: रीलस्टार भैय्या गायकवाडला टोलनाक्यावर बेदम मारहाण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

हवाला आणि क्रिप्टोकरन्सी माध्यमातून पैसे उकळले - 

दरम्यान, तपासात असेही आढळले की आरोपींनी कमावलेल्या पैशांचे एजन्सींचे लक्ष चुकवण्यासाठी हवाला मार्गांनी क्रिप्टोकरन्सीत रूपांतर केले. अटक केलेल्या चारही आरोपींना अहमदाबाद येथील पीएमएलए विशेष न्यायालयात हजर केले, जिथे न्यायालयाने त्यांना पुढील चौकशीसाठी पाच दिवसांची ईडी कोठडी दिली. ईडीची टीम आता या नेटवर्कमधील उर्वरित सदस्यांचा शोध घेण्याचे काम करत आहे.


सम्बन्धित सामग्री