Monday, November 17, 2025 06:36:05 AM

Fake AI Video of PM Modi: दुकानच्या जाहिरातीसाठी पंतप्रधान मोदींचा बनावट AI व्हिडिओ बनवला; सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही, तर AI च्या मदतीने बनवलेला आहे.

fake ai video of pm modi दुकानच्या जाहिरातीसाठी पंतप्रधान मोदींचा बनावट ai व्हिडिओ बनवला सोशल मीडियावर फुटले नव्या वादाला तोंड

Fake AI Video of PM Modi: दिल्लीतील 'आयेशा मायशा' फॅशन स्टोअरने त्यांच्या प्रमोशनसाठी एक AI-निर्मित व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुकानात येताना आणि मालकाशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. 3 सप्टेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. परंतु, सोशल मीडियावर वापरकर्त्यांनी लगेच ओळखले की हा व्हिडिओ खरा नाही, तर AI च्या मदतीने बनवलेला आहे.

व्हिडिओवर विवाद: कायदेशीर आणि नैतिक प्रश्न

व्हिडिओ शेअर होताच व्यक्तिमत्त्व हक्क आणि गोपनीयता कायद्यांचे उल्लंघन होऊ शकते, असा सवाल उपस्थित झाला. दरम्यान, एक्सवर अनेकांनी या व्हिडिओवर प्रश्न विचारले. तसेच AI व्यावसायिक वापरावर नियमांची मागणी झाली. भारतात सार्वजनिक व्यक्तींचा चेहरा परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूसाठी वापरणे व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन ठरू शकते. जरी डीपफेकसाठी अद्याप विशिष्ट कायदा नसेल, अशा प्रकरणांमध्ये आयटी कायद्याच्या कलमांनुसार कारवाई केली जाऊ शकते.

हेही वाचा - Julia Stewart Success Story: अपमानाचा बदला ! कंपनीच विकत घेतली आणि जुन्या बॉसला दाखवला बाहेरचा रस्ता, नेमकं काय आहे प्रकरण?

पारदर्शकतेसाठी मागणी

सामाजिक माध्यमांवर लोकांनी AI सामग्रीसाठी पारदर्शकता आवश्यक असल्याचे म्हटले आहे. AI द्वारे तयार केलेल्या प्रत्येक व्हिडिओ किंवा फोटोवर वॉटरमार्क किंवा डिस्क्लेमर असावा, असे सुचवले जात आहे. AI द्वारे बनवलेल्या प्रत्येक गोष्टीवर स्पष्टपणे लिहिलेले असावे की, ते AI आहे, अशी मागणीही अनेक वापरकर्त्यांनी केली आहे. 

हेही वाचा - Sara TendulKar च्या या फोटोमागील सत्य काय आहे? या मुलासोबत ती गोव्याला जात असल्याच्या अफवा

या AI व्हिडिओमुळे स्टोअरला अल्पकालीन प्रसिद्धी मिळाली असली तरी, त्याने AI च्या नैतिक आणि कायदेशीर पैलूंवर गंभीर वाद निर्माण केला आहे. AI साधने सोपी होत असल्यामुळे, लोकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कठोर नियम आणि पारदर्शकता आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 


सम्बन्धित सामग्री