मुंबई : गुजरातमधील वडोदरा आणि अहमदाबाद भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मुंबई येथून गुजरातला जाणाऱ्या पश्चिम रेल्वेच्या ५ मेल एक्स्प्रेस बुधवारी आणि गुरुवारी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये बुधवारी दादर भूज सुपरफास्ट एक्स्प्रेस, वांद्रे भूज एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल अहमदाबाद गुजरात सुपरफास्ट एक्स्प्रेस, बोरिवली नंदुरबार एक्स्प्रेस रद्द होणार असून, गुरुवारी बोरिवली अहमदाबाद एक्स्प्रेस रद्द होणार आहे. वडोदरा विभागातील बाजवा रानोली सेक्शन आणि अहमदाबाद विभागातील वधारवा मालिया मियाना सेक्शनमध्ये पुराचे पाणी भरल्याने या गाड्या रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवले आहे.