Thursday, March 12, 2026 09:46:34 PM

Income Tax Update: 'फॉर्म 16' होणार इतिहासजमा! 1 एप्रिलपासून नवीन कर नियमावली लागू

भारत सरकारच्या प्रस्तावित आयकर नियम 2026 नुसार, 1 एप्रिल 2026 पासून आयकर प्रणालीमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत.

income tax update फॉर्म 16 होणार इतिहासजमा 1 एप्रिलपासून नवीन कर नियमावली लागू

Income Tax Update: जर तुम्ही पगारदार कर्मचारी असाल, तर दरवर्षी जून-जुलै महिन्यात मिळणारा 'फॉर्म 16' तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मात्र, आता तुम्हाला या नावाशी निरोप घ्यावा लागू शकतो. भारत सरकारच्या प्रस्तावित आयकर नियम 2026 नुसार, 1 एप्रिल 2026 पासून आयकर प्रणालीमध्ये मोठे फेरबदल होणार असून, अनेक जुने फॉर्म नवीन नावांनी आणि क्रमांकांनी ओळखले जातील.

फॉर्म 16 खरोखरच बंद होत आहे का?
अनेक करदात्यांमध्ये 'फॉर्म 16' बंद होणार असल्याची भीती आहे, परंतु तसे नाही. हा फॉर्म बंद होत नसून त्याचे केवळ पुनर्क्रमांकन (Renumbering) केले जात आहे. नवीन नियमांनुसार, सध्याचा 'फॉर्म 16' आता 'फॉर्म 130' या नावाने ओळखला जाईल. टीडीएस (TDS) प्रमाणपत्र देण्याचे त्याचे मूळ कार्य तेच राहील, फक्त त्याला नवीन ओळख दिली जाईल.

फॉर्मच्या नावांमध्ये होणारे इतर महत्त्वाचे बदल
केवळ फॉर्म 16 नाही, तर प्राप्तिकराशी संबंधित इतर अनेक महत्त्वाच्या फॉर्मची नावे बदलणार आहेत. प्रस्तावित बदल खालीलप्रमाणे असू शकतात:

फॉर्म 16 (TDS प्रमाणपत्र): आता फॉर्म 130
फॉर्म 12BB (गुंतवणूक घोषणा): आता फॉर्म 125
फॉर्म 10E (थकीत पगार सवलत): आता फॉर्म 118

नवीन कर कायद्यातील (मसुदा नियम 2026) प्रमुख तरतुदी
हा नवीन कायदा केवळ नाव बदलापुरता मर्यादित नसून, करदात्यांना मोठा दिलासा देणाऱ्या अनेक सुधारणा यात प्रस्तावित आहेत:

HRA सवलतीत वाढ: आतापर्यंत केवळ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या शहरांना 50 टक्के HRA सवलत मिळत होती. आता पुणे, बेंगळुरू, अहमदाबाद आणि हैदराबाद या शहरांचाही यात समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.

शिक्षण भत्ता: मुलांच्या शिक्षण भत्त्याची मर्यादा सध्याच्या केवळ 100 रुपयांवरून थेट 3,000 रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव आहे. तथापी, आयकराचे क्लिष्ट नियम कमी करण्याचा सरकारचा मानस आहे. नियमांची संख्या 511 वरून 333 पर्यंत कमी केली जाईल, ज्यामुळे कर भरणे सोपे होईल.

हेही वाचा - EPFO Intrest Rate: तुमच्या पीएफ खात्यात किती पैसे जमा होणार? व्याजाच्या दराबाबत आली मोठी अपडेट, 'या' तारखेला होणार महत्त्वपूर्ण बैठक

करदात्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
सध्या करदात्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तुमचे सध्याचे सर्व फॉर्म 31 मार्च 2026 पर्यंत वैध राहतील. हे नवीन बदल 2026-27 या कर निर्धारण वर्षापासून लागू होतील. पुढील वर्षी जेव्हा तुम्ही तुमच्या कंपनीकडे टीडीएस प्रमाणपत्राची मागणी कराल, तेव्हा तुम्हाला 'फॉर्म 16' ऐवजी 'फॉर्म 130'चा मागावा लागेल, हे लक्षात ठेवा. 
 


सम्बन्धित सामग्री