उत्तर प्रदेश : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी प्रयागराज येथे गंगा पूजन करून महाकुंभाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते 5 हजार 500 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. कुंभ हे कोणत्याही बाह्य प्रणालीपेक्षा मनुष्याच्या आंतरिक चेतनेचे नाव आहे. ही जाणीव आपोआप जागृत होते. ही जाणीव भारताच्या कानाकोपऱ्यातून लोकांना संगमाच्या काठावर खेचते. त्यामुळे हा महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे मी पुन्हा एकदा सांगतो. ज्यामध्ये प्रत्येक प्रकारच्या भेदभावाचा त्याग केला जात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
महाकुंभ म्हणजे एकतेचा महायज्ञ असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. महाकुंभ 2025 साठी प्रयागराज सजणार आहे. उत्तर प्रदेशातील विविध विकास कामाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.