नवी दिल्ली : केंद्र सरकारने उकडा तांदूळ (परबॉइल्ड राइस) आणि तपकिरी तांदूळ (ब्राऊन राइस) यांना निर्यात शुल्कातून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी यासंबंधीची - अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी करण्यात आली. उकडा तांदूळ व तपकिरी तांदूळ यांच्या निर्यातीवर १० टक्के शुल्क होते. ते आता शून्य करण्यात आले आहे. धान निर्यातीवरील शुल्कही शून्य करण्यात आले आहे. ही सवलत २२ ऑक्टोबरपासून अमलात आली आहे. निर्यात शुल्कातील कपातीस निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे.