मुंबई: अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर रविवारी, 19 एप्रिल 2026 रोजी देशातील किरकोळ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात फारसा बदल दिसून आला नाही. सोन्याचे दर 1.5 लाख रुपयांच्या वर कायम आहेत. त्यामुळे खरेदीसाठी बाजारात उत्साह असला तरी ग्राहकांना मोठा खर्च करावा लागत आहे.
देशभरात 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 154900 रुपये इतका नोंदवला गेला. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 141992 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीचा दर 999 फाईन गुणवत्तेसाठी 259210 रुपये प्रति किलो इतका होता.
मुंबई मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 155780 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 22 कॅरेट सोन्यासाठी 142800 रुपये मोजावे लागत आहेत. चांदीचा दर 275000 रुपये प्रति किलो आहे.
हेही वाचा: Dairy Farming Scheme: स्वतःचा डेअरी व्यवसाय सुरू करायचा आहे? 'या' सरकारी योजनेतून मिळेल भरघोस मदत; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
नवी दिल्ली मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 155930 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 142920 रुपये आहे, तर चांदीचा दर 275000 रुपये प्रति किलो आहे.
अहमदाबाद मध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 155830 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 142850 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 275000 रुपये प्रति किलो आहे.
बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 155780 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर 142800 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मात्र हैदराबादमध्ये चांदीचा दर 280000 रुपये प्रति किलो इतका आहे.
चेन्नई मध्ये देशातील सर्वाधिक दर नोंदवले गेले. येथे 24 कॅरेट सोन्याचा दर 156660 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 22 कॅरेट सोन्याचा दर 143600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीचा दर 280000 रुपये प्रति किलो इतका आहे.
हेही वाचा: Mango Prices Increased: अक्षय्य तृतीयेला हापूसची गोडी महागली; पाहा तुमच्या बजेटमध्ये कोणता आंबा बसेल?