नवी दिल्ली: होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर देशातील सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली असून सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले आहेत. जागतिक बाजारातील कमकुवत वातावरण आणि मजबूत होत असलेला अमेरिकी डॉलर (US Dollar) यामुळे मौल्यवान धातूंच्या किमतींवर दबाव दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर जवळपास 5 टक्क्यांनी घसरून सुमारे 5,050 डॉलर प्रति औंस पातळीवर आला, ज्याचा थेट परिणाम भारतीय बाजारावरही झाला.
आज 4 मार्च 2026 रोजी भारतात 24 कॅरेट सोन्याचा दर सुमारे 16,762 रुपये प्रति ग्रॅम नोंदवला गेला, जो मागील सत्राच्या तुलनेत 289 रुपयांनी कमी आहे. त्यानुसार 8 ग्रॅम सोन्याची किंमत 1,34,096 रुपये झाली असून 10 ग्रॅमसाठी 1,67,620 रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यास 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 16,76,200 रुपये इतकी झाली आहे, जी कालच्या तुलनेत 28,900 रुपयांनी घसरली आहे. सोन्याच्या दरात सहा हजार रुपयांची तर चांदीच्या भावात तब्बल 24 हजार रुपयांची घसरण नोंदवली गेली आहे.
त्याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या प्रति ग्रॅम दर 15,365 रुपये असून त्यात 265 रुपयांची घट झाली आहे. 8 ग्रॅम सोन्याची किंमत 1,22,920 रुपये, तर 10 ग्रॅमचा दर 1,53,650 रुपये इतका झाला आहे. मोठ्या व्यवहारांमध्ये 100 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 15,36,500 रुपये इतकी नोंदवली गेली आहे.
हेही वाचा: Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी इशारा; ‘इतकी’ जमीन किंवा जास्त उत्पन्न असेल तर धान्य होणार बंद
18 कॅरेट सोन्याच्या दरांवरही दबाव दिसून आला. या प्रकारातील सोन्याचा दर प्रति ग्रॅम 12,572 रुपये इतका असून त्यात 216 रुपयांची घसरण झाली आहे. 8 ग्रॅमसाठी 1,00,576 रुपये, तर 10 ग्रॅमसाठी 1,25,720 रुपये मोजावे लागत आहेत. मोठ्या प्रमाणात खरेदी करताना 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याची किंमत 12,57,200 रुपये इतकी झाली आहे. महाराष्ट्रातील जळगाव मध्ये आज सोन्याचे दर 1 लाख 61 हजार 500 रुपयांवर पोहचले आहेत तर जीएसटी सह सोन्याचे दर 1लाख 66 हजार 345 रुपयांवर गेले आहेत.
दरम्यान, चांदीच्या दरातही हालचाल दिसून आली आहे. भारतात आज एक किलो चांदीची किंमत जीएसटीसह चांदीचे दर 2 लाख 79 हजार 130 रुपयांवर आले आहेत. जागतिक आर्थिक आणि भू-राजकीय परिस्थितीमुळे मौल्यवान धातूंच्या बाजारात अस्थिरता कायम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
तज्ज्ञांच्या मते, होळीच्या सुट्टीनंतर बाजार पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर सोने-चांदीच्या दरांमध्ये अधिक चढ-उतार दिसू शकतात. अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमधील तणाव, वाढणारे ऊर्जा दर आणि मजबूत डॉलर यांचा प्रभाव मौल्यवान धातूंच्या किमतींवर पुढील काही दिवस कायम राहू शकतो. त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे.
हेही वाचा: Anti Radiation Missile: सीमा पार न करताच शत्रूचा गेम ओव्हर; 300 किलोमीटरवरून साधणार अचूक वेध, भारताच्या नव्या क्षेपणास्त्राने चीन-पाकिस्तानची झोप उडवली