Tuesday, February 17, 2026 08:21:17 AM

Gold Silver Rates Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी? एका दिवसात सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण; पाहा आजचे दर

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील नफा वसुली (Profit Booking), डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंवर मोठा दबाव निर्माण झाला.

gold silver rates today सोनं खरेदीची सुवर्णसंधी एका दिवसात सोन्याच्या दरात ऐतिहासिक घसरण पाहा आजचे दर

नवी दिल्ली: शुक्रवारचा दिवस बुलियन मार्केटसाठी अक्षरशः ‘ब्लॅक फ्रायडे’ ठरला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX, Multi Commodity Exchange) आणि हाजिर बाजारात घडलेली घसरण पाहून गुंतवणूकदारही अवाक् झाले. एकाच दिवसात सोने-चांदीच्या किमतींमध्ये इतिहासातील मोठी घसरण नोंदवली गेली. चांदी तब्बल एक लाख रुपयांपेक्षा जास्त स्वस्त झाली, तर सोनेही प्रति 10 ग्रॅम 33000 रुपयांपर्यंत कोसळले. वायदा व्यवहारासोबतच स्थानिक बाजारातही दर कमी झाले.

या घसरणीचा थेट परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारातही दिसून आला. एप्रिल डिलिव्हरीसाठी असलेल्या सोन्याने (Gold) 5480 डॉलर प्रति औंसचा उच्चांक गाठल्यानंतर 11 टक्क्यांहून अधिक घसरण नोंदवली. अमेरिकेत सायंकाळी सुमारे सहा वाजता सोने 4763 डॉलर प्रति औंस या दराने व्यवहार करत होते. चांदीच्या बाबतीत मार्च डिलिव्हरीची चांदी 118.34 डॉलर प्रति औंसवरून थेट 31 टक्क्यांनी घसरून 78.83 डॉलरवर आली. ट्रेडिंग दरम्यान चांदी 74.15 डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली होती.

देशांतर्गत सराफा बाजारातही या घसरणीचे तीव्र पडसाद उमटले. 17.53 टक्के घसरणीनंतर 24 कॅरेट सोन्याचा दर आज सुमारे 160580 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. याचवेळी 22 कॅरेट सोने 147200 रुपये, तर 18 कॅरेट सोने 120440 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर आहे. चांदीचा भावही मोठ्या घसरणीनंतर सध्या सुमारे 340000 रुपये प्रति किलोच्या आसपास आहे.

हेही वाचा: Education New Policy: आधारवड हरपला तरी कुटुंब सावरणार! खाजगी शाळांमधील अनुकंपा भरतीचे नियम बदलले; जाणून घ्या सविस्तर

सराफ बाजारात घसरण अधिक तीव्र स्वरूपाची दिसून आली. शुक्रवार, 5 मार्च एक्सपायरी असलेली चांदी थेट 291922 रुपये प्रति किलोवर आली. गुरुवारी हीच चांदी 399893 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. विशेष म्हणजे, गुरुवारीच ट्रेडिंगदरम्यान चांदीने 420048 रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.

सोन्याच्या वायदा व्यवहारातही मोठा धक्का बसला. MCX वर 2 एप्रिल एक्सपायरी असलेल्या सोन्याचा भाव शुक्रवारी 150849 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला. गुरुवारी सोन्याने 193096 रुपये प्रति 10 ग्रॅमचा ऑल टाइम हाय गाठला होता, तर दिवसअखेर 183962 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. अवघ्या 24 तासांत झालेली ही उलथापालथ बाजारासाठी धक्कादायक ठरली.

तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील नफा वसुली (Profit Booking), डॉलरमधील चढ-उतार आणि जागतिक पातळीवरील अनिश्चितता यामुळे मौल्यवान धातूंवर मोठा दबाव निर्माण झाला. इतक्या कमी वेळेत झालेली ही प्रचंड घसरण गुंतवणूकदारांसाठी इशाराच मानली जात असून, पुढील काही दिवस बाजारात मोठी अस्थिरता कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी...', उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्ट मत


सम्बन्धित सामग्री