सोने व चांदीच्या दरांमध्ये दिवाळीच्या आधीपासून झालेली घसरण अजूनही सुरूच आहे. भारतात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोनेचा दर गेल्या दहा दिवसांत अंदाजे 8400 रुपये नी घसरला आहे. काही दिवसांपूर्वी 10 ग्रॅम सोने 1,30,860 रुपये मध्ये मिळत होते, तर आत्ताची किंमत 1,22,460 रुपये इतकी झाली आहे.
चांदीचा दरही कमी झाला आहे. आज चांदीची किंमत प्रति किलो 1,54,900 रुपये इतकी असून, कालची किंमत 1,55,000 रुपये प्रति किलो होती.
स्थानीक बाजारातही घट दिसत आहे. कोलकातेमध्ये 100 ग्रॅम चांदीचा दर 15,100 रुपये, तर 1 किलो चांदीचा दर 1,51,000 रुपये इतका नोंदला गेला आहे. पुण्यात 24 कॅरेट सोने प्रति ग्रॅम 12,246 रुपये, 22 कॅरेट सोने 11,225 रुपये, आणि 18 कॅरेट सोने 9,184 रुपये प्रति ग्रॅम इतके आहेत. मुंबईतही पुण्याप्रमाणे हेच दर लागू आहेत.
त्याचबरोबर, चेन्नईमध्ये 100 ग्रॅम चांदी 16,990 रुपये, आणि 1 किलो चांदी 1,69,900 रुपये इतकी नोंद झाली आहे.
हेही वाचा: अबब! सात महिन्याच्या गर्भवती महिलेनं उचललं 145 किलो वजन; दिल्ली कॉन्स्टेबलची वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये शानदार कामगिरी
विश्लेषकांचे मत आहे की, यामागील प्रमुख कारणे आहेत. सणासुदीच्या काळात मागणी पूर्ण होणे, गुंतवणूकदारांनी नफा वसूल करणे, आणि जागतिक चलन व चलन धोरणांतील बदल. विशेषतः डॉलरच्या किमतीतील वाढ आणि जागतिक बाजारातील तणाव कमी होण्यामुळे सोने चांदीच्या किंमतींवर दबाव आला आहे.
गुंतवणूकदारांनी या परिस्थितीचा वापर “सणासुदीपूर्वी खरेदीची संधी” म्हणून करण्याची शक्यता आहे. परंतु तज्ज्ञांनी सुचविले आहे की, सोने किंवा चांदी खरेदी करण्यापूर्वी आपल्या गुंतवणुकीचे उद्दिष्ट, कालावधी आणि बजेट यांचा विचार करावा. तसेच गोल्ड ईटीएफ किंवा चांदीचे पर्याय यांसारख्या व्यावसायिक साधनांचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.
तथापि, ही घसरण अल्पकालीन असू शकते; दीर्घकालीन दृष्टिकोनातून सोने व चांदी हे सुरक्षित विक्री व गुंतवणुकीचे माध्यम म्हणून राहतील, असा अंदाज विश्लेषकांचा आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत संतुलित समतोल राखून गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल.
हेही वाचा: Amazon Employee Layoff : अॅमेझॉनमध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात; 30 हजार कर्मचाऱ्यांना गमवावी लागणार नोकरी