आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत 5,000 डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. जागतिक स्तरावर आलेल्या या वादळामुळे भारतीय ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागणार असून, सोने-चांदीच्या किमतींनी आज एक नवीन इतिहास रचला आहे. सोने-चांदीच्या या अनपेक्षित दरवाढीमागे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक व्यापारी धोरणे कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
आज जागितक बाजारात सोनं-चांदीच्या दराने नवा उच्चांक गाठला आहे. यामागे काही महत्त्वाची कारण देखील आहेत. यामध्ये पहिलं कारण म्हणजे, ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्या, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाला 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी दिली आहे.
हेही वाचा- Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : "दानवेंची शिंदेसेनेत जाण्याची प्रोसेस सुरु झाली" अंबादास दानवे उद्धव ठाकरेंची साथ सोडणार? शिवसेनेतील बड्या नेत्याचं वक्तव्य
एवढचं नव्हे तर फेडरल रिझर्व्हने चलनविषयक धोरणात केलेली शिथिलता याकडे तज्ज्ञांचे लक्ष वेधले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आगामी काळात व्याजदरात दोनवेळा कपात करण्याची शक्यता आहे. अमेरिकेत व्याजदरात झालेल्या कपातीमुळे 2026 पर्यंत सोन्याची किंमत प्रति औंस 5,000 डॉलर्सच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. यामुळे व्याजदर कमी झाल्यास गुंतवणुकीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
जेव्हा व्याजदर कमी होतात, तेव्हा बाँड्समधील परतावा घटतो. तसेच डॉलर कमकुवत झाल्याने सोने खरेदी करणे अधिक स्वस्त होते यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. तसेच US-NATO मधील ग्रीनलैंड विवाद आणि वेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना झालेली अटक यामुळे जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.