Sunday, March 08, 2026 01:35:56 PM

Gold Silver Rate Today: सततच्या घसरणीनंतर सोन्याने पुन्हा घेतली झेप; चांदीच्या दरातही विक्रमी वाढ, तुमच्या शहरातील आजचे दर काय?

भारतामध्ये सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

gold silver rate today सततच्या घसरणीनंतर सोन्याने पुन्हा घेतली झेप चांदीच्या दरातही विक्रमी वाढ तुमच्या शहरातील आजचे दर काय

नवी दिल्ली: 18 फेब्रुवारी रोजी देशांतर्गत सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरात वाढ नोंदवली गेली. स्पॉट मार्केटमधील वाढती मागणी आणि जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दरांमध्ये तेजी दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर बुधवारी सकाळच्या सत्रात सोने 1.17 टक्क्यांनी वाढून 1,53,195 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होते, तर चांदीने 2.54 टक्क्यांनी उसळी घेत 2,34,589 रुपये प्रति किलो असा स्तर गाठला.

मुंबईतील स्पॉट मार्केटमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,200 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, तर 22 कॅरेट सोने 1,41,350 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने उपलब्ध होते. या दरांमध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

हेही वाचा: Pune News: पोहता येत नसतानाही पाण्यात उतरला, मित्रांसोबत फिरायला गेलेला आयुष घरी परतलाच नाही; मुळशीच्या लोटस पाँईंवर नेमकं काय घडलं?

प्रमुख शहरांतील दरांकडे पाहिले असता, दिल्ली आणि जयपूर येथे 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,500 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,350 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोने 1,41,400 रुपये आणि 24 कॅरेट सोने 1,54,250 रुपये होते. पुणे, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता या शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 1,41,350 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,54,200 रुपये प्रति 10 ग्रॅम नोंदवला गेला.

भारतामधील सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारभाव, आयात शुल्क, कररचना आणि चलन विनिमय दरातील चढ-उतार यावर अवलंबून असतात. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम म्हणून दररोजच्या किमती ठरतात.

भारतामध्ये सोने हे केवळ गुंतवणुकीचे साधन नसून सांस्कृतिक आणि सामाजिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. विवाहसोहळे, सण-उत्सव आणि पारंपरिक समारंभांमध्ये सोन्याला विशेष स्थान आहे. बदलत्या बाजारस्थितीत गुंतवणूकदार आणि व्यापारी दरातील हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवतात. सध्याच्या अस्थिर वातावरणात अद्ययावत माहिती ठेवणे हेच सुज्ञ गुंतवणुकीचे पहिले पाऊल ठरते.

हेही वाचा: Stock Market Today: शेअर बाजाराची 'धडाकेबाज' सुरुवात, पण काही मिनिटांतच रंग बदलला; वाचा काय घडलं


सम्बन्धित सामग्री