Gold-Silver Rates Today : सोने आणि चांदीच्या दरांनी आज पुन्हा एकदा गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. 19 जानेवारी 2026 रोजी भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या किमतीत किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत असून, चांदीने मात्र ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली आहे. महागाई आणि जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते, तर चांदीचा औद्योगिक वापर वाढल्याने त्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
सोन्याचे आजचे दर: 18, 22 आणि 24 कॅरेटचे समीकरण
आज भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रती ग्रॅम 14,377 रुपये इतका आहे. दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रती ग्रॅम 13,179 रुपये नोंदवण्यात आली आहे. तसेच, 18 कॅरेट सोन्याचा दर 10,783 रुपये प्रती ग्रॅम आहे. कालच्या तुलनेत 24 कॅरेट सोन्याच्या दरात केवळ 1 रुपयाची घट झाली असून बाजारात सध्या स्थिरतेचे वातावरण दिसत आहे.
प्रमुख शहरांतले सोन्याचे दर जाणून घेऊ..
- सध्या, दिल्लीमध्ये (Delhi Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम खरेदी करण्यासाठी 14,392 रुपये मोजावे लागतील. तर, एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 13,194 रुपये आणि 18 कॅरेटसाठी 10,798 रुपये मोजावे लागतील.
- मुंबईमध्ये (Mumbai Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम खरेदी करण्यासाठी 14,377 रुपये मोजावे लागतील. तर, एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 13,179 रुपये आणि एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 10,783 रुपये मोजावे लागतील.
- पुण्यात (Pune Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम खरेदी करण्यासाठी 14,377 रुपये मोजावे लागतील. तर, एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 13,179 रुपये आणि एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 10,783 रुपये मोजावे लागतील.
- नागपूरमध्ये (Nagpur Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम खरेदी करण्यासाठी 14,377 रुपये मोजावे लागतील. तर, एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 13,179 रुपये आणि एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 10,783 रुपये मोजावे लागतील.
- बंगळुरुमध्ये (Bangalore Gold Rate) 24 कॅरेट सोन्याचा एक ग्रॅम खरेदी करण्यासाठी 14,377 रुपये मोजावे लागतील. तर, एक ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी 13,179 रुपये आणि एक ग्रॅम 18 कॅरेट सोन्यासाठी 10,783 रुपये मोजावे लागतील.
हेही वाचा - Budget 2026 : नव्या आयकर कायद्याची अंमलबजावणी आणि करदात्यांच्या अपेक्षा; मध्यमवर्गीयांना पुन्हा मिळणार का ‘बजेट गिफ्ट’?
चांदीने केला 3 लाखांचा टप्पा पार
चांदीच्या दराने आज इतिहास रचला असून, भारताच्या काही शहरांमध्ये चांदी चक्क 3,00,000 रुपये प्रती किलोच्या पुढे गेली आहे. सध्याचा सरासरी दर 294.90 रुपये प्रती ग्राम असून, एक किलो चांदीसाठी आता 2,94,900 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नई आणि हैदराबाद सारख्या शहरात हा दर 3,00,000 रुपयांच्या वर पोहोचला आहे. औद्योगिक मागणी आणि जागतिक गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे चांदी 'पांढरे सोने' ठरत आहे.
दर का बदलतात? आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक कारणे
सोन्या-चांदीचे दर हे केवळ स्थानिक मागणीवर अवलंबून नसतात. अमेरिकन डॉलरची मजबुती, आंतरराष्ट्रीय स्तरावरील भू-राजकीय तणाव आणि जागतिक बँकांकडून होणारी सोन्याची खरेदी यावर हे दर ठरत असतात. भारतात सण-समारंभ आणि लग्नसराईच्या काळात दागिन्यांची मागणी वाढल्यामुळे स्थानिक बाजारात किमतीत वाढ पाहायला मिळते. सध्याची जागतिक परिस्थिती पाहता गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे वळत आहेत.
गुंतवणूकदारांसाठी आजची स्थिती
तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी नेहमीच फायदेशीर ठरते. जरी आज दरात किरकोळ बदल झाला असला, तरी गेल्या काही वर्षांतील सोन्याचा परतावा हा इतर गुंतवणुकीच्या तुलनेत उत्तम राहिला आहे. चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही यंदा विक्रमी परतावा मिळाला आहे. खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी आपल्या शहरातील स्थानिक टॅक्स आणि मेकिंग चार्जेस तपासून घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा - Stray Cattle : भटक्या प्राण्यांना सांभाळा अन् दरमहा कमवा 12 हजार रुपये... काय आहे सरकारची भन्नाट योजना