जगातील सर्वाधिक वापरला जाणारा वेब ब्राउझर Google Chrome सध्या गंभीर सायबर धोक्याच्या विळख्यात सापडला आहे. 19 जानेवारी रोजी Google ने जगभरातील Chrome वापरकर्त्यांसाठी तातडीचा इशारा जारी करत ब्राउझर त्वरित अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ही केवळ नियमित अपडेट प्रक्रिया नसून, डिजिटल सुरक्षेशी थेट संबंधित गंभीर बाब असल्याचे Google कडून स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत.
Google ने अद्याप या अपडेटचे संपूर्ण तांत्रिक तपशील जाहीर केले नसले, तरी Chrome मधील High Severity Security Vulnerability आढळून आल्यानंतर ही सूचना जारी करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही त्रुटी प्रत्यक्षात हॅकर्सकडून वापरली जात असल्याचे (Real World Exploitation) अहवाल सांगतात. त्यामुळे डेटा चोरी, सिस्टम हॅक होणे आणि Malicious Code Execution यांचा धोका लाखो वापरकर्त्यांवर निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही त्रुटी Chrome च्या मुख्य घटकांमध्ये, विशेषतः V8 JavaScript Engine मध्ये आढळून आली आहे. सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांना फसव्या वेबसाईट्सवर नेऊन या बगचा फायदा घेत Arbitrary Code Execute करू शकतात. Google ने नेहमीप्रमाणे बगचे तपशील अपडेट पूर्ण होईपर्यंत गोपनीय ठेवण्याची धोरणात्मक भूमिका घेतली आहे.
हेही वाचा: Asaduddin Owaisi: "माझ्या यशावर भाजप जळतेय!" असदुद्दीन ओवैसींचा भाजपवर थेट प्रहार
Google ने हा Security Patch Windows, macOS, Linux आणि Android या सर्व प्लॅटफॉर्मसाठी रोलआउट केला आहे. बहुतांश वेळा Chrome आपोआप अपडेट होतो, मात्र वापरकर्त्यांनी स्वतः तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी Chrome उघडून Three-dot Menu → Help → About Google Chrome या पर्यायात जाऊन अपडेट उपलब्ध आहे का ते पाहावे. अपडेट झाल्यानंतर ब्राउझर Restart करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
Chrome वर वारंवार सायबर हल्ले होण्यामागे त्याची प्रचंड लोकप्रियता हे प्रमुख कारण मानले जाते. Advanced Web Apps, Extensions आणि Cross-platform Architecture मुळे Chrome चे Attack Surface मोठे आहे. 2025 मध्ये आतापर्यंत Chrome मध्ये आठ Zero-Day Vulnerabilities आढळल्या असून, 2024 मध्ये हा आकडा 10 होता. याशिवाय CVE-2024-0519, CVE-2024-4671 आणि CVE-2024-7971 यांसारख्या त्रुटींचा वापर करून हॅकर्सनी डेटा चोरी केल्याचेही समोर आले आहे.
या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे, कितीही विश्वासार्ह सॉफ्टवेअर असले तरी सायबर धोका कायम असतो. Google वेळीच पॅच देत असले, तरी अंतिम जबाबदारी वापरकर्त्यांचीच आहे. वेळेवर अपडेट न केल्यास काही तासांचा विलंबही मोठ्या आर्थिक व वैयक्तिक नुकसानीला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे आता ब्राउझर अपडेट करणे हा पर्याय नसून, ती एक डिजिटल जबाबदारी बनली आहे.
हेही वाचा: SC On Shiv Sena : शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कोणाचं? सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली; आता 'या' दिवशी होणार फैसला