Sunday, March 08, 2026 10:34:28 PM

Google Personal History: इंटरनेटवर तुमचे खासगी फोटो किंवा नंबर दिसतोय? नो टेन्शन ; गुगलने आणलंय 'हे' भन्नाट टूल, जाणून घ्या नवी ट्रिक

गुगलने सर्च रिजल्टमधून संवेदनशील माहिती हटवण्याची प्रक्रिया सुलभ करणारे नवे टूल सादर केले आहे.

google personal history इंटरनेटवर तुमचे खासगी फोटो किंवा नंबर दिसतोय नो टेन्शन  गुगलने आणलंय हे भन्नाट टूल जाणून घ्या नवी ट्रिक

नवी दिल्ली: इंटरनेटच्या युगात वैयक्तिक माहितीची (Personal Information) सुरक्षितता हा मोठा मुद्दा बनला आहे. Google Search वर संवेदनशील माहिती किंवा तुमचे फोटो दिसत असल्यास आता काळजी करण्याचे कारण नाही. Google ने अलीकडेच एक नवे Tool सादर केले असून, त्याद्वारे Search Results मधून Sensitive Information काढून टाकण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.

या नव्या सुविधेमुळे (Feature Update) वापरकर्त्यांना आपत्तिजनक Content Report करणे आणि Search वर स्वतःची माहिती नियंत्रित करणे सुलभ झाले आहे. कोणतीही संवेदनशील माहिती किंवा फोटो हटवण्यासाठी संबंधित Search Result समोरील Three Dot Menu वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर ‘Remove Result’ हा पर्याय निवडून Google ला याचे कारण सांगावे लागेल. जर आपल्याला वाटत असेल की एखादा फोटो किंवा वैयक्तिक माहिती अयोग्य पद्धतीने दिसत असेल, तर त्याबाबत तपशील देऊन विनंती दाखल करता येते.

हेही वाचा: Road Accident News: लग्नाचा आनंद ठरला शेवटचा; महामार्गावर भीषण अपघात; एकाच गावातील सहा तरुणांचा मृत्यू

विशेष म्हणजे, आता ‘Results About You’ या विभागात जाऊन आपण Removal Request Track करू शकता. यापूर्वी प्रत्येक लिंक किंवा फोटोसाठी वेगवेगळी विनंती करावी लागत होती; मात्र आता एका विनंतीमध्ये एकापेक्षा अधिक फोटो रिपोर्ट करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद आणि User Friendly झाली आहे.

Google च्या मते, Removal Request मंजूर (Approved) झाल्यानंतर वापरकर्ते एक अतिरिक्त Feature Enable करू शकतात. त्यानंतर भविष्यात त्यांच्या नावाशी संबंधित इतर Sensitive Results देखील आपोआप Filter Out केले जातील. Artificial Intelligence (AI) Generated आणि Deepfake Content च्या वाढत्या गैरवापराच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा विशेष महत्त्वाची ठरत आहे. भारतासह अनेक देशांमध्ये हा अपडेट Roll Out करण्यात आला आहे.

दरम्यान, भारत सरकारनेही AI Generated आणि Deepfake Content संदर्भात नियम अधिक कडक केले आहेत. आता अशा Content वर स्पष्ट Label लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. जर एखादा वापरकर्ता AI Generated Content Upload करत असेल, तर त्याची माहिती देणे आवश्यक राहील. तसेच सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवरील आपत्तिजनक आणि वादग्रस्त माहिती काढण्यासाठी केवळ तीन तासांची मुदत देण्यात आली आहे. हे नवे नियम 20 फेब्रुवारीपासून लागू होणार असून, डिजिटल सुरक्षिततेकडे सरकारचे लक्ष अधिक केंद्रीत झाल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: 'रोहित पवारांप्रमाणेच आम्हालाही यात मोठा कट वाटतोय...'; पिंकी माळीच्या वडिलांच्या दाव्याने खळबळ


सम्बन्धित सामग्री