Tuesday, March 10, 2026 03:09:35 AM

Dhar Murder Case: हृदयद्रावक! धारमध्ये आईसमोर 5 वर्षाच्या मुलाला संपवलं; संतप्त जमावाने मारहाण करून घेतला आरोपीचा जीव

कुक्षी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली गावात शुक्रवारी एका पाच वर्षांच्या मुलाची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली.

dhar murder case हृदयद्रावक धारमध्ये आईसमोर 5 वर्षाच्या मुलाला संपवलं संतप्त जमावाने मारहाण करून घेतला आरोपीचा जीव

Dhar Murder Case: मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. कुक्षी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अली गावात शुक्रवारी एका पाच वर्षांच्या मुलाची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली. मारेकरी मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, 25 वर्षीय आरोपी महेश दुचाकीवरून आला आणि कालू सिंगच्या घरात घुसला. त्याने घरात पडलेले धारदार हत्यार उचलले आणि लहान विकासवर वार करून त्याची मान धडापासून वेगळी केली. यानंतर त्याने मुलाच्या खांद्यावरही प्रहार करत शरीर विद्रूप केले. विशेष म्हणजे आरोपीचा पीडित कुटुंबाशी काहीही संबंध नव्हता.

आईसमोर भयावह प्रसंग

या घटनेदरम्यान मुलाची आई मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करताना जखमी झाली. तिच्या डोळ्यासमोरच तिच्या मुलाची हत्या झाली. तिच्या ओरडण्याने शेजारी घटनास्थळी धावून आले. त्यांनी आरोपीला पकडून जोरदार मारहाण केली.

हेही वाचा - Thane Crime : ठाण्यात एएसआय लाच घेताना अटकेत; वडाळा टीटी ठाण्यातील दोन अधिकारीही ACB च्या जाळ्यात

आरोपीचाही मृत्यू

गावकऱ्यांच्या मारहाणीमुळे आरोपी महेश गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, धरचे पोलिस अधीक्षक मयंक अवस्थी यांनी सांगितले की, मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. आरोपी महेश हा अलिराजपूर जिल्ह्यातील जोबत बागडी गावचा रहिवासी असून तो मानसिकदृष्ट्या आजारी होता. तो काही दिवसांपासून घरातून बेपत्ता होता. हत्येच्या एक तास आधी त्याने जवळच्या दुकानातून चोरीचाही प्रयत्न केला होता.

हेही वाचा - Kapil Sharma Threat Case : कपिल शर्माच्या व्यवस्थापकाला एक कोटी रुपयांच्या खंडणीचा फोन; आरोपी अटकेत

गावात शोककळा

या भीषण घटनेमुळे अली गावात शोककळा पसरली आहे. तसेच संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक लोकांनी या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला आहे.


सम्बन्धित सामग्री