Sunday, November 16, 2025 06:15:49 PM

Rajasthan Shocker : हृदयद्रावक घटना! पती-पत्नीच्या वादाची मुलांना शिक्षा; आईनं 4 मुलांसह केलं विष प्राशन, अन्...

शहरातील अनिरुद्ध रेसिडेन्सीमध्ये एका महिलेने आपल्या चार लहान मुलांसह विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

rajasthan shocker  हृदयद्रावक घटना पती-पत्नीच्या वादाची मुलांना शिक्षा आईनं 4 मुलांसह केलं विष प्राशन अन्

Rajasthan Shocker: राजस्थानमधील सिकर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील अनिरुद्ध रेसिडेन्सीमध्ये एका महिलेने आपल्या चार लहान मुलांसह विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये आई किरण आणि तिच्या दोन मुलांचा आणि दोन मुलीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किरणचा तिच्या पतीसोबत काही दिवसांपासून वाद सुरू होता. या कौटुंबिक वादामुळे ती आपल्या मुलांसह वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होती. काही दिवसांपासून तिच्याशी संपर्क होत नसल्याने आणि फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडला तेव्हा समोर दिसलेले दृश्य अत्यंत भयावह होते. यावेळी पाचही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. 

हेही वाचा - 100 Kilometer Cyclothon : मुंबईत 26/11 च्या शहीदाला आदरांजली; NSG तर्फे मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या सन्मानार्थ सायक्लोथॉनचे आयोजन

घरात आढळली विषाची 10 पाकिटे 

दरम्यान, फॉरेन्सिक तज्ञ आणि पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून, घरात विषाची दहा पाकिटे आढळली आहेत. त्यापैकी आठ पाकिटे वापरलेली असल्याचे निष्पन्न झाले आहे. प्राथमिक तपासानुसार, सर्वांनी एकाच वेळी विष प्राशन केले असावे असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दुर्गंधीमुळे घरात प्रवेश करण्याआधी पोलिसांना अगरबत्ती आणि सुगंधी द्रव्यांचा वापर करावा लागला. मृतदेहांना शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलीस या मृत्यूमागील कारणांचा तपास करत आहेत. 

हेही वाचा - Coldriff Cough Syrup : 'कोल्ड्रिफ' बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाचा न्यायालयात 'अजब' दावा; म्हणे, 'अनेक वर्षांपासून उत्पादन सुरू, मात्र कधीही कोणी...'

या घटनेने स्थानिकांमध्ये तीव्र संताप आणि दु:खाची भावना व्यक्त केली जात आहे. एका आईने निरपराध चार मुलांसह असे टोकाचा निर्णय घेतल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सर्व पैलूंची चौकशी सुरू केली असून, या प्रकरणातील खरे कारण तपासानंतरचं स्पष्ट होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री