Amit Shah On GST Reforms: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जीएसटी सुधारणा मध्यमवर्गीयांसाठी फायदेशीर ठरणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, या सुधारणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गरीब, तरुण, शेतकरी आणि महिलांना मदत करण्याच्या दृढनिश्चयाचा पुरावा आहेत. सोमवारपासून लागू होणाऱ्या या सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाला गती देतील आणि देशाला जागतिक स्तरावर समृद्ध राष्ट्र बनवण्याच्या मार्गावर घेऊन जातील.
अमित शाह यांनी 'जीएसटी बचत महोत्सव' या हॅशटॅगसह सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केले की, जीएसटीदर कमी झाल्यामुळे दैनंदिन जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, शैक्षणिक साहित्य आणि इतर उत्पादने स्वस्त होतील, ज्यामुळे मध्यमवर्गीयांचे उत्पन्न वाढेल आणि त्यांना अधिक बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.
हेही वाचा - Free LPG Connection: नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन
दरम्यान, अमित शाह यांनी म्हटलं आहे की, 'या सुधारणा प्रत्येक घरात आनंद घेऊन येत आहेत. 390 हून अधिक वस्तूंवरील जीएसटी दरांमध्ये ऐतिहासिक कपात करण्यात आली आहे.' त्यांनी नमूद केले की, अन्नधान्य, घरगुती वस्तू, घरबांधणी साहित्य, ऑटोमोबाईल्स, खेळणी, हस्तकला, शिक्षण, वैद्यकीय सेवा, विमा आणि इतर क्षेत्रांतील जीएसटी दर कमी होऊन नागरिकांच्या खिशाला आराम मिळेल.
हेही वाचा - Share Market Today : आठवड्याची सुरूवात लालेलाल ; H-1B व्हिसा नियमांमुळे शेअर मार्केटच्या गटांगळ्या
याशिवाय, दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी शून्य करण्यात आला आहे, तर साबण, टूथब्रश, टूथपेस्ट, केसांचे तेल आणि शॅम्पू यांसारख्या दैनंदिन वस्तूंवर सवलत दिली गेली आहे. कृषी उपकरणे आणि खतांवरील जीएसटी कपातमुळे शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होणार आहे. नागरिकांना आता वाहने खरेदी करताना चिंता करण्याची गरज नाही. तथापी, दैनंदिन वस्तूंसाठी स्वदेशी उत्पादने स्वीकारण्याचा संदेशही यावेळी शाह यांनी दिला आहे.