Sunday, March 08, 2026 01:49:13 PM

BCCI Annonces Prize: विजेत्या युवा शिलेदारांवर पैशांचा पाऊस; BCCI कडून साडेसात कोटींचे बक्षीस जाहीर; खेळाडूंच्या वाट्याला येणार 'इतकी' रक्कम

आता चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे की ही बक्षीसाची रक्कम नेमकी कशी वाटली जाणार?

bcci annonces prize विजेत्या युवा शिलेदारांवर पैशांचा पाऊस bcci कडून साडेसात कोटींचे बक्षीस जाहीर खेळाडूंच्या वाट्याला येणार इतकी रक्कम

नवी दिल्ली: भारताच्या युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वावर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ICC Under-19 Cricket World Cup 2026 च्या अंतिम सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने इंग्लंडचा तब्बल 100 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात मानाचा सहावा तुरा रोवला गेला असून, संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहण्याचा पराक्रमही या संघाने केला आहे.

अंतिम लढतीत भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी डोंगराएवढे आव्हान उभे केले होते. भारताचा सलामीवीर, अवघ्या 14 वर्षांचा 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशी याने इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः दमछाक केली. त्याने केवळ 80 चेंडूत 175 धावांची वादळी खेळी करत विश्वचषकाच्या फायनलमध्ये सर्वोच्च धावसंख्येचा नवा विक्रम प्रस्थापित केला. आयुष म्हात्रे याच्या संयमी नेतृत्वगुणांनी आणि खेळाडूंच्या सांघिक कामगिरीने इंग्लंडचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला आणि टीम इंडियाने एकतर्फी विजय साकारला.

हेही वाचा: Sunil Thapa Passes Away: धक्कादायक! 'मेरी कोम'च्या प्रशिक्षकाचे निधन, वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

या दिमाखदार विजयानंतर Board of Control for Cricket in India (BCCI) ने युवा खेळाडूंसाठी खजिना बाहेर आणला आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी भारतीय संघासाठी साडेसात कोटी रुपयांच्या भरघोस बक्षीसाची घोषणा केली. मैदानावरील घाम गाळणाऱ्या या खेळाडूंचे आणि त्यांना घडवणाऱ्या पडद्यामागच्या नायकांचे कौतुक करताना त्यांनी सांगितले की, "या विजयाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे."

आता चाहत्यांमध्ये एकच चर्चा आहे की ही बक्षीसाची रक्कम नेमकी कशी वाटली जाणार? सूत्रांनुसार, बीसीसीआयने जाहीर केलेली ही साडेसात कोटी रुपयांची रक्कम केवळ खेळाडूंसाठीच नसून त्यात सपोर्ट स्टाफचाही समावेश आहे. यामध्ये मुख्य प्रशिक्षक आणि इतर तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या योगदानानुसार वाटा मिळेल. प्रामुख्याने खेळाडूंच्या वाट्याला प्रत्येकी 30 ते 50 लाख रुपयांची रक्कम येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावणाऱ्या या युवा खेळाडूंवर सध्या सोशल मीडियापासून ते गल्लीबोळापर्यंत कौतुकाचा वर्षाव होत आहे.  ही नवी पिढी भविष्यातील टीम इंडियाची मजबूत फळी असल्याचे या विजयाने अधोरेखित केले आहे. आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी आणि संपूर्ण टीमने दाखवलेला हा जोश आगामी काळात भारतीय क्रिकेटला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवेल, यात शंका नाही.

हेही वाचा: Mumbai Crime: हा कसला शौक! चक्क घरात पाळली होती जिवंत मगर; वन विभाग व क्राईम ब्रँचच्या कारवाईनंतर सर्व प्रकार उघडकीस


सम्बन्धित सामग्री