Saturday, May 17, 2025 09:35:06 PM

तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांकडून IED स्फोट; 3 पोलिस शहीद

नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे हा हल्ला केला आहे. ज्या भागात हल्ला झाला तो भाग छत्तीसगडच्या सुकमा सीमेला लागून आहे. पोलिसांच्या हालचालींबद्दल नक्षलवाद्यांना आधीच माहिती होती.

तेलंगणामध्ये नक्षलवाद्यांकडून ied स्फोट 3 पोलिस शहीद
IED Blast प्रतिकात्मक प्रतिमा
Edited Image

हैदराबाद: तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलिस शहीद झाले आहेत. नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाद्वारे हा हल्ला केला आहे. ज्या भागात हल्ला झाला तो भाग छत्तीसगडच्या सुकमा सीमेला लागून आहे. पोलिसांच्या हालचालींबद्दल नक्षलवाद्यांना आधीच माहिती होती. या हल्ल्यात तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांचे पथक नियमित कोम्बिंग ऑपरेशन करत असताना हा स्फोट झाला. या दरम्यान नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणल्याचे पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात तीन पोलिसही जखमी झाले. यापूर्वी 7 मे रोजी, छत्तीसगड-तेलंगणा सीमेवरील विजापूर जिल्ह्यातील कर्रेगुट्टा टेकड्यांवरील जंगलात बुधवारी नक्षलवाद्यांची सुरक्षा दलांशी चकमक झाली होती. या चकमकीत 22 हून अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले होते. या कारवाईत सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, बुधवारी सकाळी करेगुट्टा टेकड्यांच्या जंगलात गोळीबार झाला.

हेही वाचा - भारताने उधळला पाकिस्तानचा डाव! अमृतसरमध्ये हवेतचं पाडले पाकिस्तानी क्षेपणास्त्र

कारेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये सर्वात मोठी कारवाई - 

दरम्यान, सुरक्षा दल 22 एप्रिलपासून कारेगुट्टाच्या टेकड्यांमध्ये ऑपरेशन करत आहेत. कारेगुटा पर्वत पाच हजार फूट उंचीवर आहे. अशा परिस्थितीत, 20 हजारांहून अधिक सैनिकांनी डोंगरावर उपस्थित असलेल्या 2 हजारांहून अधिक नक्षलवाद्यांना घेरले आहे. यामध्ये हिडमा आणि देवा सारखे नक्षलवादी नेते देखील समाविष्ट आहेत. माहितीनुसार, हा परिसर नक्षलवाद्यांचा गड मानला जातो. आतापर्यंत कोणत्याही राज्य सरकारने एवढी मोठी नक्षलवादी कारवाई सुरू केलेली नाही. अशा परिस्थितीत ही नक्षलवादी कारवाई सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

हेही वाचा - उत्तरकाशीतील गंगनीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 6 प्रवाशांचा मृत्यू

या कारवाईत 24 हजारांहून अधिक सैनिक सहभागी होते. या ऑपरेशनमध्ये जिल्हा राखीव रक्षक, बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स, सीआरपीएफसह एकूण 24000 पोलिसांचा सहभाग होता. 
 


सम्बन्धित सामग्री