Monday, February 10, 2025 12:59:14 PM

IED Blast In Bijapur-Dantewada Border
IED Blast In Bijapur-Dantewada Border: बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात आयईडी स्फोट; 3 जवान जखमी

या घटना बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात घडल्या, जिथे सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाई करत होते.

ied blast in bijapur-dantewada border बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात आयईडी स्फोट 3 जवान जखमी
IED Blast In Bijapur-Dantewada Border
Edited Image

IED Blast In Bijapur-Dantewada Border: छत्तीसगडमधील बिजापूर-दंतेवाडा सीमावर्ती भागात झालेल्या आयईडी स्फोटात किमान तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना माओवादविरोधी कारवाईदरम्यान घडली. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या घटना बिजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात घडल्या, जिथे सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी कारवाई करत होते.

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या आयईडी स्फोटात केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (सीआरपीएफ) एक जवान आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) दोन कर्मचारी जखमी झाले. प्राथमिक अहवालानुसार, दोन जवानांनी चुकून प्रेशर-अ‍ॅक्टिव्हेटेड आयईडी स्फोट केला, ज्यामुळे स्फोट झाला, तर तिसऱ्या जवानाने नक्षलवाद्यांनी लावलेल्या स्पाइक ट्रॅपवर पाऊल ठेवले. 

दोन जवानांना रायपूरला हलवण्यात आलं -  

जखमी कर्मचाऱ्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. तसेच पुढील उपचारांसाठी रायपूरला विमानाने नेण्यात आले. आयईडी स्फोटात जखमी झालेल्या दोन जवानांना रायपूरमधील श्री नारायण रुग्णालयात आणण्यात आले. जखमी जवानांना अनेक जखमा झाल्या आहेत. डीआरजी कॉन्स्टेबल विजय कुमार (वय, 26) आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल प्रमोद कुमार (वय, 42) अशी जखमी जवानांची नावे आहेत. नक्षलवाद्यांच्या घटनेत जखमी झालेल्या आणखी एका जवानालाही चांगल्या वैद्यकीय मदतीसाठी रायपूर येथे आणण्यात आले आहे.

रायपूर येथील श्री नारायण रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील खेमका यांनी सांगितले की, 'दोन जवानांना येथे आणण्यात आले आहे. आणखी एका जवानाला लवकरच येथे दाखल करण्यात येईल. प्रमोद कुमारच्या पायाला दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करू. विजय कुमारला यांना किरकोळ दुखापत झाली आहे.'

विजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून 2 जणांची हत्या - 

छत्तीसगडमधील विजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी दोन जणांची हत्या केली. सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी विजापूर जिल्ह्यातील एका गावात दोन जणांची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना तार्रेम पोलिस स्टेशन हद्दीतील बुगडीचेरू गावात घडली. अज्ञात नक्षलवाद्यांनी करम राजू (३२) आणि माधवी मुन्ना (२७) अशी ओळख असणाऱ्या दोन ग्रामस्थांची धारदार शस्त्राने हत्या केली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. 
 


सम्बन्धित सामग्री