Saturday, May 17, 2025 09:21:33 PM

'जर पाकिस्तानने असं केलं तर...', ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल यांचा पाकड्यांना इशारा

अजित डोवाल यांनी जागतिक समकक्षांना पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढवण्याचा भारताचा कोणताही हेतू नसल्याचे आश्वासन दिले आहे.

जर पाकिस्तानने असं केलं तर ऑपरेशन सिंदूरनंतर अजित डोवाल यांचा पाकड्यांना इशारा
Ajit Doval
Edited Image

नवी दिल्ली: भारताने आज 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या लष्करी कारवाईनंतर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोभाल यांनी अनेक देशांमधील त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली आहे. तथापि, अजित डोवाल यांनी जागतिक समकक्षांना पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानसोबत तणाव वाढवण्याचा भारताचा कोणताही हेतू नसल्याचे आश्वासन दिले आहे.

अजित डोभाल यांची अनेक देशांच्या समकक्षांशी चर्चा -  

भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी बुधवारी अनेक देशांच्या त्यांच्या समकक्षांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी सांगितले की, भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, परंतु जर पाकिस्तानने असे केले तर भारत 'कडक प्रत्युत्तर' देण्यास तयार आहे. अजित डोवाल यांचे हे विधान पाकिस्तानसाठी एक इशारा आहे. 

दरम्यान, अजित डोभाल यांनी आज अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल माहिती दिली. त्यांनी रशिया आणि फ्रान्सशीही संपर्क प्रस्थापित केला. 

हेही वाचा - ‘आम्ही त्यांनाचं मारले, ज्यांनी निष्पापांचे जीव घेतले...'; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह यांची प्रतिक्रिया

अजित डोभाल ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती - 

प्राप्त माहितीनुसार, डोभाल यांनी यूएस एनएसए आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ, यूकेचे जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे मुसैद अल ऐबान, यूएईचे एचएच शेख तहनौन आणि जपानचे मसाताका ओकानो यांच्याशी ऑपरेशन सिंदूर संदर्भात चर्चा केली. त्यांनी रशियन एनएसए सर्गेई शोइगु, सीपीसी सेंट्रल कमिटीच्या पॉलिटिकल ब्युरोचे सदस्य आणि पीपल्स रिपब्लिक ऑफ चायनाचे परराष्ट्र मंत्री वांग यी आणि फ्रेंच अध्यक्ष इमॅन्युएल बोन यांचे राजनैतिक सल्लागार यांच्याशीही संपर्क साधला. तथापि, येत्या काळात डोभाल त्यांच्या समकक्षांच्या संपर्कात राहतील. त्यांनी या देशांच्या अधिकाऱ्यांना ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण माहिती दिली. 

हेही वाचा - 'हे' आहेत जगातील 5 सर्वात महागडे लढाऊ विमाने; ऑपरेशन सिंदूरनंतर होत आहे चर्चा

ऑपरेशन सिंदूरमध्ये एनएसए अजित डोभाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. एनएसए अजित डोभाल हे 2014 पासून भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. यापूर्वी, रॉ एजंट म्हणून, ते पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये मोहिमांवर होते. अशा परिस्थितीत, ऑपरेशन सिंदूर व्यतिरिक्त उरी आणि पुलवामा दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्यात एनएसए अजित डोभाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 
 


सम्बन्धित सामग्री