Monday, February 10, 2025 07:21:34 PM

Narendra Modi
पंतप्रधानांच्या हस्ते 'उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा' संमेलनाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे  'उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा' संमेलन 2025 चे उद्घाटन केले.


पंतप्रधानांच्या हस्ते  उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा संमेलनाचे उद्घाटन

ओडिशा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे  'उत्कर्ष ओडिशा- मेक इन ओडिशा' संमेलन 2025 चे उद्घाटन केले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी जानेवारी 2025 या महिन्यातील त्यांची ही दुसरी भेट असल्याचे सांगताना त्यांनी प्रवासी भारतीय दिवस 2025 या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी ओडिशाला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली. ओडिशामध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी व्यावसायिक शिखर परिषद  असल्याचे नमूद करत मोदी यांनी मेक इन ओडिशा संमेलन 2025 मध्ये पाच ते सहा पट जास्त गुंतवणूकदार सहभागी झाले असल्याची माहिती दिली. त्यांनी ओडिशाची जनता आणि ओडिशा सरकारचे देखील या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केले. 

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.

गुंतवणूक आणि व्यावसायिक संधींसाठी एक पोषक केंद्र म्हणून ओडिशा राज्याच्या क्षमतेचे दर्शन या कार्यक्रमातून घडत आहे. पूर्व भारत देशाच्या विकासामधील ऊर्जावृद्धी करणारे इंजिन आहे. यामध्ये ओडिशाची भूमिका महत्त्वाची असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी म्हटले आहे. आज भारत कोट्यवधी जनतेच्या आकांक्षांच्या बळावर विकासाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. ओडिशा खरोखरच असाधारण आहे, ओडिशा आशावादाचे आणि अस्सलपणाचे प्रतीक आहे, ओडिशा ही संधींची भूमी आहे आणि येथील जनतेने असामान्य कामगिरी करण्याची लालसा नेहमीच दाखवली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून साताऱ्यातील रस्त्याच्या विकासकामांसाठी बैठक

भारत हरित भवितव्य आणि हरित तंत्रज्ञानावर भर देत आहे. 21 व्या शतकातील भारतासाठी, हे युग म्हणजे सर्व काही परस्परांशी जोडलेल्या पायाभूत सुविधा आणि मल्टी मोडल कनेक्टिव्हिटी याविषयीचे आहे. ओडिशामध्ये पर्यटनाची प्रचंड क्षमता आहे. युवा प्रतिभेचे प्रचंड मोठे भांडार आणि संगीत कार्यक्रमांचा चाहता असलेला अतिशय मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने भारतामध्ये जोमाने वृद्धिंगत होणाऱ्या संगीत कार्यक्रमांची अर्थव्यवस्था बनण्याच्या अमाप संभावना आहेत असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. 


सम्बन्धित सामग्री