Thursday, November 13, 2025 08:57:39 AM

India-Mongolia Agreement: भारत-मंगोलिया संबंध अधिक दृढ! मंगोलियाच्या विकासात भारत विश्वासार्ह भागीदार; पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी म्हणाले, भारत मंगोलियाच्या विकास प्रवासात एक स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार राहिला आहे.

india-mongolia agreement भारत-मंगोलिया संबंध अधिक दृढ मंगोलियाच्या विकासात भारत विश्वासार्ह भागीदार पंतप्रधान मोदींचे वक्तव्य

India-Mongolia Relations: मंगोलियाचे अध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्या भारत दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशांमधील संबंधांना नव्या उंचीवर नेण्याचे संकेत दिले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर मोदी म्हणाले, भारत मंगोलियाच्या विकास प्रवासात एक स्थिर आणि विश्वासार्ह भागीदार राहिला आहे. उखना सोमवारी चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत आले. राष्ट्रपती म्हणून हा त्यांचा पहिलाच भारत दौरा आहे. या भेटीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चर्चेनंतर पंतप्रधान मोदींनी जाहीर केले की, भारत मंगोलियाच्या नागरिकांसाठी मोफत ई-व्हिसा सुविधा सुरू करणार आहे. त्यांनी म्हटले, भारत आणि मंगोलिया हे केवळ राजनैतिक भागीदार नाहीत. बौद्ध धर्माच्या तत्त्वांवर आधारित आपले आध्यात्मिक नाते हजारो वर्षांपासून दृढ आहे. 

हेही वाचा - India US Trade: मोठा टर्निंग पॉइंट! अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारताला पहिल्यांदा मिळाली गुड न्यूज

मोदींनी पुढे सांगितले की, भारताकडून 1.7 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे कर्ज दिले गेले असून, त्याद्वारे मंगोलियामध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारला जात आहे, जो देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देईल. या बैठकीत डिजिटल सहकार्य आणि खनिज विकासावर करार झाले, जे भविष्यातील तांत्रिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. मंगोलियाचे अध्यक्ष उखना यांनी भारताच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ही भागीदारी आमच्या अर्थव्यवस्था आणि नागरिकांसाठी नवी दिशा ठरेल, असे म्हटले.

हेही वाचा - PM Modi on Gaza Peace Deal: इस्रायली बंधकांच्या सुटकेसाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक; म्हणाले, 'ट्रम्प यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना...'

राजनैतिक तज्ज्ञांच्या मते, भारत-मंगोलिया संबंधांचा बळकटीकरण चीन आणि रशियाच्या दरम्यानच्या भू-राजकीय संतुलनात भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो. मंगोलियातील ऊर्जा, खाणकाम आणि डिजिटल क्षेत्रातील भारतीय गुंतवणूक ही केवळ आर्थिकच नव्हे तर प्रादेशिक स्थैर्य आणि रणनीतिक सहकार्यासाठीही निर्णायक ठरू शकते. या भेटीत दोन्ही देशांतील मैत्रीचे केवळ पुनरुज्जीवन झाले नाही, तर आध्यात्मिक, आर्थिक आणि धोरणात्मक सहकार्यासाठी नव्या युगाची सुरुवात झाली आहे.


सम्बन्धित सामग्री