Visa-free countries: 2025 मध्ये हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताच्या पासपोर्ट रँकिंगमध्ये एक स्थान घसरण झाली असून आता भारत 81व्या क्रमांकावर पोहोचला आहे. या घसरणीमुळे भारतीय प्रवाशांसाठी व्हिसा शिवाय प्रवेश मिळणाऱ्या देशांची संख्या मर्यादित झाली आहे. तरीही, भारताच्या पासपोर्टवर अजूनही 58 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करता येतो.
यामध्ये काही लोकप्रिय पर्यटनस्थळं जसे की इंडोनेशिया, मॉरिशस, केनिया, मालदीव आणि थायलंड यांचा समावेश आहे. हे देश त्यांच्या नयनरम्य समुद्रकिनाऱ्यांसाठी, सांस्कृतिक वारशासाठी आणि भारतापासूनच्या कमी प्रवास वेळेसाठी प्रसिद्ध आहेत.
याशिवाय काही कमी प्रसिद्ध पण वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं जसे की लाओस, मॅडागास्कर, फिजी आणि झिंबाब्वे देखील या यादीत आहेत. निसर्ग पर्यटन, वन्यजीव निरीक्षण, आणि साहसी अनुभव घेण्यास इच्छुक असलेल्या प्रवाशांसाठी ही ठिकाणं एक उत्तम पर्याय ठरू शकतात.
हेही वाचा:Gold Rate Today: भारतामध्ये सोन्याच्या दरात तुफानी घसरण; केवळ 3 दिवसांत 10,400 रुपयांनी घसरले दर
भूतान, नेपाळ आणि श्रीलंका हे भारतीयांसाठी सहज प्रवेशयोग्य आहेत. तसेच कतार, कझाकस्तान, इराण आणि जोर्डनसारख्या देशांमध्येही व्हिसा ऑन अरायव्हल किंवा व्हिसा फ्री प्रवेशाची सुविधा आहे.
ही यादी भारतीय प्रवाशांना स्वप्नवत प्रवासासाठी नवनवीन दालनं खुली करत आहे. व्हिसा प्रक्रियेशिवाय सहज आणि जलद प्रवास करण्याचा लाभ आता या देशांमुळे मिळणार आहे.
व्हिसा फ्री देशांची यादी (2025):
-
अंगोला
-
बार्बाडोस
-
भूतान
-
बोलिव्हिया
-
ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स
-
बुरुंडी
-
कंबोडिया
-
केप व्हर्डे आयलंड्स
-
कोमोरोज आयलंड्स
-
कुक आयलंड्स
-
जिबूती
-
डोमिनिका
-
इथिओपिया
-
फिजी
-
ग्रेनेडा
-
गिनी-बिसाऊ
-
हैती
-
इंडोनेशिया
-
इराण
-
जमैका
-
जोर्डन
-
कझाकस्तान
-
केनिया
-
किरीबाटी
-
लाओस
-
मकाओ
-
मॅडागास्कर
-
मलेशिया
-
मालदीव
-
मार्शल आयलंड्स
-
मॉरिशस
-
मायक्रोनेशिया
-
मंगोलिया
-
मॉन्टसेराट
-
मोजांबिक
-
म्यानमार
-
नामीबिया
-
नेपाळ
-
न्यूई
-
पॅलाऊ आयलंड्स
-
कतार
-
रवांडा
-
सामोआ
-
सेनेगल
-
सेशेल्स
-
सिएरा लिओन
-
सोमालिया
-
श्रीलंका
-
सेंट किट्स अँड नेव्हिस
-
सेंट लूसिया
-
सेंट व्हिन्सेंट अँड ग्रेनेडाइन्स
-
टांझानिया
-
थायलंड
-
तिमोर-लेस्ते
-
त्रिनिदाद अँड टोबॅगो
-
टुवालु
-
वनुआतु
-
झिंबाब्वे
ही यादी पाहता, भारतीय पर्यटकांनी आता नवीन देश अनुभवण्यासाठी तयारी करायला हवी. कमी खर्चात, कमी कागदपत्रांच्या झंझटीशिवाय आता अधिकाधिक देशांमध्ये सहजपणे प्रवास करता येणार आहे.
हेही वाचा:शुक्र संक्रमण 2025: नशिबाचं द्वार उघडणार! पुढील 2 दिवसांत या 3 राशींना मिळणार अमूल्य सौख्य आणि समृद्धी