राजस्थानमधील भिवाडी येथील एका केमिकल कारखान्यात शक्तिशाली स्फोटात आठ कामगार जिवंत जळाले, तर चार जण गंभीर भाजले. समोर आलेल्या माहितीनुसार, कारखान्यात बेकायदेशीर फटाके बनवले जात होते. तपासावेळी घटनास्थळावरून गनपावडर, फटाके आणि पॅकिंग कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.
आज सकाळी साडे नऊ वाजता खुशखेडा करौली औद्योगिक क्षेत्रात हा अपघात झाला. मंत्री संजय शर्मा म्हणाले, हा एक गारमेंट झोन आहे येथे इतर कोणताही व्यवसाय करण्यास परवानगी नाही. बंद गेटच्या मागे बेकायदेशीर फटाके बनवले जात होते. मृतांची डीएनएद्वारे ओळख पटवली जात आहे. बहुतेक कामगार बिहारचे असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा - JEE Mains 2026 Results: जेईई मेन्स निकाल जाहीर; सत्र 1 मध्ये 12 विद्यार्थ्यांना 100 पर्सेटाईल; असा तपासा तुमचा स्कोअर
गेट नेहमीच बंद
कारखाना सुमारे दीड ते दोन महिन्यांपासून सुरू होता. तेथे फटाके बनवले जात होते, परंतु कोणालाही आत जाऊ दिले जात नव्हते. गेट नेहमीच बंद असे, अशी माहिती जवळच्या कारखान्याचे कर्मचारी सुरेश कुमार यांनी दिली.