Israel-Iran conflict: इराण आणि इस्रायलमधील सद्यस्थिती लक्षात घेता, परराष्ट्र मंत्रालयाने नवी दिल्लीत 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेहरानमधील भारतीय दूतावासानेही भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टमध्ये परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, 'इराण आणि इस्रायलमधील सध्याच्या घडामोडी लक्षात घेऊन परराष्ट्र मंत्रालयात 24x7 नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.'
परराष्ट्र मंत्रालय, नवी दिल्ली– नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक (24x7):
-
टोल फ्री क्रमांक: 1800 118 797
-
फोन: +91 11 23012113, +91 11 23014104, +91 11 23017905
-
व्हॉट्सअॅप: +91 9968291988
भारतीय दूतावास, तेहरान; आपत्कालीन हेल्पलाईन (24x7):
-
फक्त कॉलसाठी: +98 9128109115, +98 9128109109
-
फक्त व्हॉट्सअॅपसाठी: +98 9010445557, +98 9015993320, +91 8086871709
-
बंदर अब्बास: +98 91776990364
-
जाहेदान: +98 9396356649
भारतीय विद्यार्थ्यांचे सुरक्षित स्थलांतर
सोमवारी परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'तेहरानमधील भारतीय दूतावास सतत सुरक्षा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि इराणमधील भारतीय विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी मदत करत आहे. काही प्रकरणांमध्ये विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. अन्य व्यवहार्य पर्यायांचाही विचार केला जात आहे.'