नवी दिल्ली: भारतामध्ये डिजिटल पेमेंट (Digital Payment) आता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. भाजी खरेदी, शॉपिंग, वीज बिल भरणे किंवा मित्रांना पैसे पाठवणे या सर्व ठिकाणी UPI (Unified Payments Interface) चा वापर होत आहे. त्यामुळे UPI नियमांमध्ये होणारा कोणताही बदल कोट्यवधी वापरकर्त्यांवर थेट परिणाम करणारा ठरतो. हे लक्षात घेऊन सरकार, Reserve Bank of India (RBI) आणि National Payments Corporation of India (NPCI) यांनी फेब्रुवारी 2026 पासून UPI साठी नवे नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नव्या नियमांचा मुख्य उद्देश UPI व्यवहार अधिक जलद करणे, फसवणूक (Fraud) रोखण्यासाठी सुरक्षा वाढवणे आणि युजर्सना त्यांच्या पैशांवर व पेमेंट्सवर अधिक नियंत्रण देणे हा आहे. Google Pay, PhonePe, Paytm किंवा कोणतेही UPI App वापरणाऱ्यांसाठी हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत.
UPI पेमेंट आता अधिक वेगवान
नव्या नियमांनुसार UPI Transaction आणि API Response (Application Programming Interface) 10 सेकंदांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक असेल. याआधी ही वेळमर्यादा 30 सेकंद होती, त्यामुळे अनेकदा पेमेंट थांबणे किंवा उशीर होणे असे प्रकार घडत होते. आता Pending किंवा Processing मध्ये अडकलेले व्यवहार कमी होतील आणि सेल, सणासुदी किंवा महिनाअखेरीच्या गर्दीतही सिस्टम अधिक सुरळीत काम करेल. यामुळे ग्राहकांसोबतच दुकानदारांनाही दिलासा मिळणार आहे.
हेही वाचा: Parth Pawar : टेंशन कायम! पार्थ पवार यांना क्लिनचीट नाही; अहवाल सादर करण्यासाठी 7 दिवसांची मुदतवाढ
API म्हणजे काय?
API म्हणजे दोन Apps किंवा Systems यांच्यात संवाद साधण्याचे माध्यम. UPI पेमेंट करताना तुमचे App तुमच्या बँकेकडे खात्यातील शिल्लक तपासते आणि समोरील बँकेकडे पैसे स्वीकारण्याचा संदेश पाठवते. ही संपूर्ण प्रक्रिया API द्वारे होते. API वेगवान झाल्याने संपूर्ण पेमेंट प्रक्रिया अधिक जलद होणार आहे.
सुरक्षेवर भर, युजर्सना अधिक कंट्रोल
UPI 2026 च्या नव्या नियमांमध्ये Security ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे, विशेषतः मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी. पेमेंटपूर्वी स्पष्ट Confirmation Message, Auto-Payment आणि Subscription साठी अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू होतील. युजर्स स्वतःचे Subscriptions सहज पाहून Cancel करू शकतील. यामुळे चुकीची कपात आणि फसवणुकीची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होईल.
दीर्घकाळ वापरात नसलेली UPI ID तात्पुरती बंद (Dormant UPI ID) केली जाऊ शकते. ती पुन्हा सुरू करण्यासाठी Re - Verification आवश्यक असेल. यामागचा उद्देश जुने व विसरलेले Accounts गैरवापरापासून वाचवणे हा आहे. तसेच, UPI पेमेंट फेल झाल्यास किंवा अडकल्यास बँक आणि Apps ना काही तासांत समस्या सोडवणे बंधनकारक असेल. युजरचे पैसे कापले गेले आहेत का, कुठे अडकले आहेत आणि कधी परत मिळतील, याची स्पष्ट माहिती दिली जाईल.
UPI वर वाढता जागतिक विश्वास
सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत UPI द्वारे सुमारे 230 लाख कोटी रुपये व्यवहार झाले आहेत, जे 2022-23 मधील 139 लाख कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त आहेत. UPI आता केवळ भारतापुरता मर्यादित नसून भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, कतार, सिंगापूर, श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) अशा आठ देशांमध्ये वापरले जात आहे. NPCI आणि सरकार मिळून P2P (Person to Person) आणि P2M (Person to Merchant) आंतरराष्ट्रीय पेमेंट अधिक सोपे करत आहेत.
हेही वाचा: Aadhaar Deactivated: UIDAI चा मोठी कारवाई; देशातील 2.5 कोटी आधार क्रमांक कायमचे हटवले, 'या' एका कारणामुळे घेण्यात आला निर्णय