Thursday, February 12, 2026 03:04:48 AM

India US Trade Deal: स्मार्टफोन, लॅपटॉप स्वस्त होणार! भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे आयात शुल्कात मोठी कपात; कोणत्या वस्तू स्वस्त होणार, कोणत्या महागच राहणार?

भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे आयात शुल्कात मोठी कपात होणार आहे

india us trade deal स्मार्टफोन लॅपटॉप स्वस्त होणार भारत-अमेरिका ट्रेड डीलमुळे आयात शुल्कात मोठी कपात कोणत्या वस्तू स्वस्त होणार कोणत्या महागच राहणार

India US Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील दीर्घकाळ प्रलंबित असलेला महत्त्वाचा व्यापार करार अखेर अंतिम टप्प्यात पोहोचला असून, या करारामुळे सामान्य ग्राहकांपासून उद्योगजगतात उत्सुकता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या दूरध्वनी चर्चेनंतर या ऐतिहासिक करारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्य अधिक मजबूत होणार असून, भारतीय बाजारपेठेवर त्याचा थेट परिणाम दिसून येणार आहे.

या व्यापार कराराचा सर्वात मोठा फायदा सामान्य ग्राहकांना होणार आहे. आयात शुल्कात कपात केल्याने अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमेरिकन ब्रँडची उत्पादने अधिक स्वस्त मिळू शकतात. लॅपटॉप, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तसेच त्यांचे सुटे भाग यांचे दर खाली येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आयफोनसारख्या प्रीमियम मोबाईल्सच्या किमतीतही काही प्रमाणात घट होऊ शकते.

कृषी क्षेत्रातही या कराराचा सकारात्मक परिणाम होणार आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळी, दुग्धजन्य पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांवरील शुल्क कमी झाल्यास, या वस्तूंच्या किमती भारतीय बाजारात स्वस्त होण्याची शक्यता आहे. याचा थेट फायदा घरगुती ग्राहकांना होणार आहे. तसेच वॉशिंग मशीन, फ्रिज यांसारख्या घरगुती उपकरणांच्या किमतीतही घट होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

हा करार केवळ आयातीपुरता मर्यादित नसून भारतीय निर्यातदारांसाठीही मोठी संधी घेऊन आला आहे. अमेरिकन बाजारात भारतीय कापड उद्योगाला अधिक बळ मिळणार असून ‘मेड इन इंडिया’ कपड्यांची मागणी वाढू शकते. रत्न व दागिने उद्योगासाठीही हा करार फायदेशीर ठरणार असून, भारतीय ज्वेलरी अधिक स्पर्धात्मक होण्याची शक्यता आहे. यासोबतच स्टील, केमिकल्स आणि इंजिनिअरिंग उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळू शकते.

या करारानुसार अमेरिकेने भारतीय उत्पादनांवरील टॅरिफ २५ टक्क्यांवरून सुमारे १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, भारतानेही अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ आणि इतर अडथळे टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, स्टील, ॲल्युमिनियम आणि काही ऑटो कंपोनेंट्सवरील उच्च आयात शुल्क कायम राहणार असल्याने सर्वच वस्तूंना दिलासा मिळणार नाही.


सम्बन्धित सामग्री