Tuesday, December 09, 2025 02:29:10 PM

India vs South Africa : बीसीसीआयने भारत vs साऊथ अफ्रिका टेस्ट मॅचची वेळ बदलली, नेमकं कारण काय?

हा सामना गुवाहाटीच्या बारसापारा स्टेडियमवरील पहिला टेस्ट असल्याने तो भारतातील टेस्ट सामने आयोजित करणाऱ्या 30व्या मैदानाच्या यादीत समाविष्ट झाला आहे.

india vs south africa  बीसीसीआयने भारत vs साऊथ अफ्रिका टेस्ट मॅचची वेळ बदलली नेमकं कारण काय

नवी दिल्ली: भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील Test Series 14 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या Eden Gardens मैदानावर खेळला जाणार आहे. दुसरा सामना गुवाहाटी येथील Barsapara Stadium मध्ये 22 नोव्हेंबरपासून सुरू होईल. दूसरा कसोटी सामना हा नेहमीपेक्षा थोडा लवकर सुरू होणार आहे. 

भारतामध्ये सामान्यतः टेस्ट सामने सकाळी साडेनऊ वाजता सुरू होतात, पण गुवाहाटीमध्ये परिस्थिती वेगळी आहे. देशात एकच Time Zone असला तरी ईशान्येकडील गुवाहाटीत सूर्य लवकर उगवतो आणि लवकर मावळतो. सध्या येथे सूर्योदय साडेपाच वाजता आणि सूर्यास्त साडेचार वाजता होतो. याच कारणामुळे गुवाहाटी टेस्टमध्ये खेळाची वेळ पुढे आणण्यात आली आहे. सामना सकाळी 9 वाजता सुरू होईल आणि टॉस सकाळी 8.30 वाजता होणार आहे.

हेही वाचा: Govinda Hospitalised: अभिनेता गोविंदाची प्रकृती बिघडली; रुग्णालयात उपचार सुरू

पहिला टी ब्रेक 11 वाजता घेतला जाईल, त्यानंतर 20 मिनिटांच्या विश्रांतीनंतर खेळ पुन्हा सुरू होईल. लंच ब्रेक 1:20 वाजता घेतला जाईल, जो 40 मिनिटांचा असेल. त्यानंतर दुपारी 2 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत शेवटचा सेशन चालेल. जर ठरलेल्या वेळेत ओव्हर्स पूर्ण झाले नाहीत, तर खेळ अर्धा तास वाढवता येईल. मात्र, गुवाहाटीत सूर्यास्त साडेचारच्या सुमारास होत असल्याने सामना वेळेतच संपवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हा सामना गुवाहाटीच्या Barsapara Stadium वर होणारा पहिलाच टेस्ट सामना असेल. त्यामुळे हा स्टेडियम भारतातील टेस्ट सामने आयोजित करणाऱ्या 30व्या मैदानाच्या यादीत समाविष्ट झाला आहे. 2017 मध्ये येथे पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला होता. आतापर्यंत येथे दोन ODI आणि तीन T20 International सामने पार पडले आहेत. गुवाहाटीतील या पहिल्या Test Match मुळे स्थानिक प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. वेळेतील बदलामुळे खेळाडूंनाही नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान असेल. ईशान्य भारतातील क्रिकेट चाहत्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, कारण Barsapara Stadium हे आता भारतीय क्रिकेटच्या नव्या इतिहासात नोंदवले गेले आहे.

हेही वाचा: Delhi Blast Update : मोठा खुलासा! देशातील 'ही' शहरेही होती हिटलिस्टवर; स्लीपर मॉड्यूल करण्यात आले होते सक्रिय


सम्बन्धित सामग्री