Rupee vs Dollar: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाला आहे. मंगळवारी, रुपया 28 पैशांनी वाढून 85.77 प्रति डॉलरवर बंद झाला आणि आज सुरुवातीच्या व्यवहारात तो 85.67 वर पोहोचला. तर शुक्रवारी तो 86.05 च्या पातळीवर बंद झाला. अमेरिकन डॉलर निर्देशांक कमकुवत झाल्यामुळे रुपया मजबूत झाला आहे. यासोबतच कच्च्या तेलाच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे, ज्याचा थेट परिणाम रुपयावर होत आहे. डॉलर निर्देशांक कमकुवत होणे म्हणजे इतर चलनांच्या तुलनेत डॉलरची मागणी कमी झाली आहे. या आठवड्यात रुपया 85.70 आणि 86.70 च्या दरम्यान व्यवहार करेल असे अहवाल सांगतात.
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत -
दरम्यान, मार्चमध्ये देशातील घाऊक महागाई दर 2.05 टक्क्यांपर्यंत घसरला आहे, जो सहा महिन्यांतील सर्वात कमी पातळी आहे. माहितीनुसार, घाऊक महागाईच्या आकडेवारीमुळे रुपयाही मजबूत झाला आहे. जगातील सर्वात शक्तिशाली चलन मानल्या जाणाऱ्या डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याचा हा सलग तिसरा दिवस आहे.
हेही वाचा - लवकरच कमी होऊ शकतात पेट्रोल-डिझेलचे दर; क्रूडच्या किमतीत 5 वर्षातील सर्वात मोठी घसरण
डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होण्याचा फायदा -
- रुपया मजबूत झाल्यामुळे परदेश प्रवास, अभ्यास आणि खरेदी स्वस्त होतात.
- स्वस्त आयातीमुळे महागाई नियंत्रणात राहण्यास मदत होते, ज्यामुळे सामान्य माणसाला दिलासा मिळतो.
हेही वाचा - ट्रम्प टॅरिफ आणि ट्रेड वॉरचा भारताला जबरदस्त फायदा; स्मार्टफोन, टीव्ही इलेक्ट्रॉनिक्स स्वस्त होणार?
रुपया मजबूत होण्याची कारणे -
अमेरिकन डॉलर निर्देशांकातील कमकुवतपणा, कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण आणि घाऊक महागाई, ही रुपया मजबूत होण्यामागची कारणं आहेत. याशिवाय, गुंतवणूकदार डॉलरपेक्षा इतर चलनांना सुरक्षित मानतात, त्यामुळे अमेरिकन डॉलर कमकुवत होताना रुपया मजबूत होतो. जर भारताच्या परकीय चलन साठ्यात डॉलर्सचे प्रमाण वाढले, तरी देखील रुपया मजबूत होतो.