Friday, May 16, 2025 02:17:59 PM

सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; BSF जवानांकडून 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर (LOC) दहशतवाद्यांचा भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे.

सांबामध्ये घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी bsf जवानांकडून 7 पाकिस्तानी दहशतवाद्यांना कंठस्नान
BSF Jawans killed 7 Pakistani Terrorists
Edited Image

सांबा: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर, सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी 7 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर (LOC) दहशतवाद्यांचा भारतात घुसखोरीचा मोठा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तान घाबरून भारतातील अनेक भागात हल्ले करत आहे.

सांबामध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न फसला -  

प्राप्त माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी सांबा सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सैनिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचे मनसुबे उधळून लावण्यात आले. सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून जैश-ए-मोहम्मदचे सुमारे 7 ते 12 दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा - खतरनाक ‘Dance of the Hillary’ व्हायरस; पाकिस्तानकडून सायबर हल्ल्याची नवी खेळी

दरम्यान, या कारवाईत एक पाकिस्तानी चौकी देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. या चौकीवरून पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसण्याचा प्रयत्न करत होते, पण सैनिकांनी दहशतवाद्यांचा डाव वेळीचं उधळून लावला. 


सम्बन्धित सामग्री