Monday, November 17, 2025 06:41:40 AM

Kupwara Encounter: नियंत्रण रेषेजवळील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

पाकव्याप्त भागातून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सतर्क जवानांनी रोखले, त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

kupwara encounter नियंत्रण रेषेजवळील केरन सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Kupwara Encounter: जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळील (एलओसी) केरन सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी केलेला घुसखोरीचा प्रयत्न रविवारी भारतीय सुरक्षा दलांनी हाणून पाडला. पाकव्याप्त भागातून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांना सतर्क जवानांनी रोखले, त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. गोळीबारादरम्यान ठार झालेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाहीत. नियंत्रण रेषेवरील कठीण भौगोलिक परिस्थिती आणि सुरू असलेल्या चकमकीमुळे जवानांना अडचणी येत आहेत.

हेही वाचा - Bihar Election: बिहार निवडणुकीसाठी 470 केंद्रीय निरीक्षक; सात राज्यांतील पोटनिवडणुकीवरही लक्ष

शोधमोहिम तीव्र

सैन्याने केरन परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध व कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले आहे. कोणताही दहशतवादी पळून जाऊ नये म्हणून अतिरिक्त फौज तैनात करण्यात आली असून, संभाव्य मार्ग सील करण्यात आले आहेत. केरन सेक्टरला नेहमीच संवेदनशील मानले जाते. हिवाळ्याआधी अशा घुसखोरीच्या हालचालींमध्ये वाढ होत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Delhi Bomb Threat: दिल्ली विमानतळ आणि शाळांना ई-मेलद्वारे बॉम्ब धमक्या; पोलीस सतर्क, चौकशी सुरू

किश्तवार जिल्ह्यात जंगलात चकमक

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यातील केशवान जंगलात देखील सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. व्हाईट नाईट कॉर्प्सच्या माहितीनुसार, गुप्तचर माहितीवर आधारित शोधमोहिम राबवली जात असताना दुपारी 1 वाजता जवान व दहशतवादी आमनेसामने आले. त्यानंतर गोळीबार झाला.
 


सम्बन्धित सामग्री