Tuesday, January 14, 2025 04:00:00 AM

Wayanad
वायनाडमध्ये जमीन खचली

केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४३ मृतदेह आढळले आहेत.

वायनाडमध्ये जमीन खचली

वायनाड : केरळमधील वायनाड येथे मेप्पडीजवळच्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. जमीन खचल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ४३ मृतदेह आढळले आहेत. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबले असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला. तसेच केरळच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बातमीत केली आणि घटनेची तसेच सुरू असलेल्या मदतकार्याची माहिती घेतली. केंद्राकडून मदतकार्यासाठी आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी केरळच्या मुख्यमंत्र्यांना दिले. 


सम्बन्धित सामग्री