Thursday, September 12, 2024 10:48:30 AM

Tripura
त्रिपुरात शांतता करार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.

त्रिपुरात शांतता करार

आगरताळा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्र सरकार, त्रिपुरा सरकार, नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा (एनएलएफटी) आणि ऑल त्रिपुरा टायगर फोर्स (एटीटीएफ) यांच्यात शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. या करारामुळे ३५ वर्षांपासून सुरू असलेली हिंसा थांबली आहे. एनएलएफटी आणि एटीटीएफने केंद्र सरकारवर विश्वास असल्यामुळेच करारावर स्वाक्षरी केल्याचे सांगितले. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी करार झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. करारात सहभागी झालेल्या सर्वांचे जाहीर आभार मानले. 

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून ईशान्य भारतात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मागील दहा वर्षात ईशान्य भारतात वेगवेगळ्या संघटनांसोबत केंद्र सरकारने १२ पेक्षा जास्त शांतता करार केले. त्रिपुराशी संबंधित असे तीन शांतता करार झाले. या करारांमुळे शांतता निर्माण होण्यास मदत होत आहे. या प्रयत्नांसाठी पंतप्रधान मोदींचे जाहीर आभार, असे त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा म्हणाले. 

काय म्हणाले गृहमंत्री अमित शाह ?

शांतता करारामुळे ३२८ जण मुख्य प्रवाहात येतील. मुख्य प्रवाहात येणाऱ्यांसाठी २५० कोटींचा मदतनिधी कराराद्वारे उपलब्ध करुन दिला जाईल. जवळपास ३५ वर्षांपासून सुरू असलेली हिंसा थांबेल. करारातील सर्व कलमांची अंमलबजावणी केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली.

           

सम्बन्धित सामग्री