Monday, March 09, 2026 08:28:40 AM

World's Most Expensive Color: सोन्यापेक्षाही मौल्यवान! 'या' रंगाच्या एका ग्रॅमची किंमत ऐकून थक्क व्हाल; काय आहे असं यात खास? वाचा

हा रंग एखाद्या सामान्य रसायनापासून नाही, तर 'लॅपिस लाझुली' (Lapis Lazuli) या अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केला जातो.

worlds most expensive color सोन्यापेक्षाही मौल्यवान या रंगाच्या एका ग्रॅमची किंमत ऐकून थक्क व्हाल काय आहे असं यात खास वाचा

World's Most Expensive Color: रंग केवळ दृश्य सौंदर्यासाठी नसून ते सत्ता, समृद्धी आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जातात. मात्र, जगात एक असा रंग आहे ज्याची किंमत ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. हा रंग सोन्या-चांदीपेक्षाही कित्येक पटीने महाग असून, आजही त्याची शुद्धता आणि दुर्मिळता अबाधित आहे. हा आहे जगप्रसिद्ध 'अल्ट्रामरीन' (Ultramarine) निळा रंग.

एका ग्रॅमची किंमत 80 हजारांच्या पार
नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या अस्सल अल्ट्रामरीन निळ्या रंगाच्या अवघ्या एक ग्रॅमची किंमत 80 हजार रुपयांहून अधिक असू शकते. हा रंग एखाद्या सामान्य रसायनापासून नाही, तर 'लॅपिस लाझुली' (Lapis Lazuli) या अर्ध-मौल्यवान दगडापासून तयार केला जातो.

का आहे हा रंग इतका खास?
लॅपिस लाझुली हा दगड गडद निळ्या रंगाचा असतो. यामध्ये असलेल्या 'पायराइट' खनिजामुळे त्यावर सोनेरी ठिपके दिसतात, ज्यामुळे हा दगड चांदण्यांनी भरलेल्या आकाशासारखा भासतो. इतिहासानुसार, या दगडाच्या सर्वात प्राचीन आणि शुद्ध खाणी अफगाणिस्तानातील 'बदख्शान' प्रांतात आहेत. 'अल्ट्रामरीन' हा शब्द लॅटिन भाषेतील 'अल्ट्रामाराइन्स' (Ultramarines) पासून आला आहे, ज्याचा अर्थ होतो 'समुद्राच्या पलीकडून आलेला'. युरोपमध्ये हा दगड उपलब्ध नसल्याने तो आशियातून आयात करावा लागत असे, ज्यामुळे त्याची किंमत गगनाला भिडली होती.

हेही वाचा -Burj Khalifa Dubai Tourism : जगातील सर्वात उंच इमारतीच्या आत आहे तरी काय? बुर्ज खलिफाची दररोजची कमाई जाणून चक्रावून जाल

जटिल निर्मिती प्रक्रिया
हा रंग तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती. मध्ययुगीन काळात लॅपिस लाझुली दगडाची पावडर करून, ती विविध तेले आणि रसायनांसोबत अनेक टप्प्यांवर शुद्ध केली जात असे. या अत्यंत कठीण आणि वेळखाऊ प्रक्रियेनंतर जो निळा पिगमेंट (द्रव्य) शिल्लक राहायचा, तो अत्यंत शुद्ध आणि मौल्यवान असायचा. यामुळेच ऐतिहासिक चित्रकलेत हा रंग केवळ अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तींच्या चित्रांसाठी किंवा धार्मिक कलाकृतींसाठी वापरला जाई. 


सम्बन्धित सामग्री