Mukesh Ambani Deal with Facebook: भारतीय उद्योगजगतामधील अग्रगण्य उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कंपनीने मेटा प्लॅटफॉर्म्स इंकची उपकंपनी असलेल्या Facebook Overseas Inc. सोबत हातमिळवणी करत एआय क्षेत्रातील संयुक्त उपक्रमाची घोषणा केली आहे. या नव्या कंपनीचे नाव Reliance Enterprise Intelligence Limited (REIL) असे ठेवण्यात आले आहे.
या संयुक्त उपक्रमात रिलायन्सचा 70 टक्के, तर फेसबुकचा 30 टक्के हिस्सा असेल. आरआयएलने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 24 ऑक्टोबर 2025 रोजी रिलायन्स इंटेलिजेंस लिमिटेडच्या माध्यमातून या नव्या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
855 कोटी रुपयांची भांडवलाची गुंतवणूक
रिलायन्स आणि फेसबुक या दोन्ही कंपन्या मिळून 855 कोटींचे प्रारंभिक भांडवल गुंतवणार आहेत. यात मोठा वाटा रिलायन्सचा असेल. कंपनीने स्पष्ट केले आहे की या भागीदारीसाठी कोणत्याही सरकारी किंवा नियामक मंजुरीची आवश्यकता नव्हती, त्यामुळे प्रक्रिया जलद पार पडली.
हेही वाचा - AI Features in Instagram : इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये आता 'Meta AI' ची जादू! टेक्स्ट कमांड्स देऊन फोटो-व्हिडिओ एका झटक्यात बदला
AI सोल्यूशन्स विकसित करणार
REIL ही कंपनी मोठ्या व्यवसायांसाठी आणि उद्योगांसाठी कस्टमाइज्ड AI सोल्यूशन्स विकसित करणार आहे. यात डेटा अॅनालिटिक्स, ऑटोमेशन, प्रेडिक्टिव मॉडेलिंग आणि स्मार्ट डिसीजन सपोर्ट सिस्टम्सचा समावेश असेल. तज्ञांच्या मते, हा करार भारतीय उद्योगक्षेत्राला जागतिक AI स्पर्धेत एक मजबूत स्थान मिळवून देईल.
हेही वाचा - Instagram New Feature: इंस्टाग्रामचे जबरदस्त अपडेट; आता पाहा आधी पाहिलेल्या रील्स पुन्हा, 'Watch History' फीचरने केली कमाल
रिलायन्सचा डिजिटल विस्तार
रिलायन्सने याआधी जिओद्वारे भारतात दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवली होती. आता कंपनीचे लक्ष AI आणि क्लाउड कॉम्प्युटिंग क्षेत्रावर आहे. मेटासोबतचा हा करार रिलायन्सला जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक बळकट करणार आहे. 2020 मध्ये फेसबुकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 5.7 अब्ज डॉलर इतकी गुंतवणूक केली होती. त्या वेळी फेसबुकला जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9.99 टक्के हिस्सा मिळाला होता. आता या नव्या करारामुळे रिलायन्स आणि मेटा या दोन्ही दिग्गज कंपन्यांमधील सहकार्य आणखी दृढ होणार आहे.