Wednesday, July 09, 2025 09:19:52 PM

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी साकिब नाचनचा मृत्यू

नाचनला सोमवारी तिहार तुरुंगातून डीडीयू रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी सफदरजंग येथे दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी दुपारी 12:10 वाजता त्याचा मृत्यू झाला.

मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी साकिब नाचनचा मृत्यू
Saquib Nachan
Edited Image

Saquib Nachan Death: भारतात दहशत पसरवण्याच्या कटात सहभागी असलेला ISIS टोळीचा म्होरक्या साकिब अब्दुल हमीद नाचन याचे निधन झाले आहे. तुरुंगात असताना त्याला मेंदूत रक्तस्त्राव झाला, त्यानंतर त्याला सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. येथे त्याचे निधन झाले. नाचनला सोमवारी तिहार तुरुंगातून डीडीयू रुग्णालयात आणण्यात आले. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला बुधवारी सफदरजंग येथे दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी दुपारी 12:10 वाजता त्याचा मृत्यू झाला.

साकिब नाचन मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी - 

2002-03 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी ठरवल्यापासून साकिब नाचन सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. त्याच्यावर सिमीसारख्या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध असल्याचा आणि भारतात आयसिसच्या कारवायांना प्रोत्साहन देण्याचा आरोपही होता. 2023 मध्ये एनआयएने त्याला महाराष्ट्रातील पडघा येथून इतर 15 संशयितांसह अटक केली. तपासात असे दिसून आले की हे लोक आयईडी बनवून देशात दहशत पसरवण्याची तयारी करत होते. नाचन स्वतःला या गटाचा म्होरक्या मानत होता. 

हेही वाचा - RAW New Chief: IPS पराग जैन यांची रॉ च्या प्रमुख पदी नियुक्ती; ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली होती मोठी भूमिका

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण - 

मुंबई बॉम्बस्फोटामुळे शहर पूर्णपणे हादरले होते. मुंबई शहर एकामागून एक तीन बॉम्बस्फोट करण्यात आले होते. हे बॉम्बस्फोट विलेपार्ले, मुलुंड आणि मुंबई सेंट्रल भागात झाले होते, ज्यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 116 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणात 10 जणांना दोषी ठरवण्यात आले होते, त्यापैकी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

हेही वाचा - कौतुकास्पद! जागतिक मान्यता रेटिंग सर्वेक्षणात पंतप्रधान मोदी जगात पहिल्या क्रमांकावर

साकिब नाचन तरुणांना 'बयत' म्हणजेच आयसिसच्या खलिफाशी निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्यास भाग पाडत असे. तसेच तो तरुणांना या संघटनेत सामील करून घेत असे. यापूर्वीही 2021 आणि 2023 मध्ये त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. अटकेपूर्वीच त्याची तब्येत बिघडली होती. अखेर आज त्याचा मृत्यू झाला. 
 


सम्बन्धित सामग्री