Tuesday, November 18, 2025 03:11:40 AM

Share Market Today News : शेअर मार्केट आज सुरू राहणार की बंद ? मोठी अपडेट समोर

गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की 22 ऑक्टोबर, बुधवारी शेअर बाजार खुला राहील की व्यवहार होणार नाही?

share market today news  शेअर मार्केट आज सुरू राहणार की बंद  मोठी अपडेट समोर

भारतीय शेअर बाजाराने मंगळवार, 21 ऑक्टोबर रोजी मुहूर्त ट्रेडिंग सत्र पार पाडले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही किरकोळ वाढीसह बंद झाले.  यापूर्वी सोमवार, २० ऑक्टोबर रोजी सलग चौथ्या व्यापार सत्रात वाढ दिसून आली. आता, गुंतवणूकदारांना प्रश्न पडला आहे की 22 ऑक्टोबर, बुधवारी शेअर बाजार खुला राहील की व्यवहार होणार नाही?  याबद्दल आता सविस्तरपणे जाणून घेऊया. 

शेअर बाजाराच्या यादीनुसार, दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त आज भारतीय शेअर बाजार सामान्य व्यवहारांसाठी बंद राहील. बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया (एनएसई) तसेच कमोडिटी एक्सचेंज - मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (एमसीएक्स) आणि नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह्ज एक्सचेंज (एनसीडीईएक्स) यांनी आज ट्रेडिंग सुट्टी जाहीर केली आहे.

हेही वाचा - Diwali Muhurat Trading 2025: दिवाळी मुहूर्ताच्या विशेष ट्रेडिंग सत्रात बाजारात तेजी; सेन्सेक्स 250 अंकांनी वाढला

मंगळवारी मुहूर्ताच्या व्यवहारात बजाज फिनसर्व्हच्या शेअर्समध्ये वाढ झाली, 1.11 टक्क्यांनी वाढ होऊन तो 2,136.15 रुपयांवर बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 62.97 अंकांनी म्हणजेच 0.07 टक्क्यांनी वाढून 84,426.34  वर बंद झाला. तर एनएसई निफ्टी 25.45 अंकांनी म्हणजेच 0.10 टक्क्यांनी वाढून 25,868.60  वर बंद झाला.

हेही वाचा - Gold Jewellery : हौस इतकी मोठी की.. जगात आतापर्यंत जितकं सोनं खाणीतून बाहेर निघालंय, त्यापैकी इतक्या सोन्याचे फक्त दागिनेच बनलेत! 

शेअर बाजार कधी बंद असणार ? 
शेअर बाजाराच्या सुट्टीच्या यादीनुसार, दिवाळी बलिप्रतिपदानिमित्त बुधवार, 22 ऑक्टोबर 2025 रोजी शेअर बाजार बंद राहील. श्री गुरु नानक जयंतीनिमित्त नोव्हेंबरमध्ये पुढील शेअर बाजार सुट्टी 5 नोव्हेंबर रोजी आहे. तसेच 25 डिसेंबरला ख्रिसमसनिमित्त फक्त एकच शेअर बाजार सुट्टी  असणार आहे. 


सम्बन्धित सामग्री