देशभरात गाजत असलेल्या ‘I Love Muhammad’ बॅनर वादाने आता न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. उत्तर प्रदेशातून सुरू झालेला हा मुद्दा महाराष्ट्र, कर्नाटकासह अनेक राज्यांत पोहोचला असून, पोलिसांनी केलेल्या कारवाईला आव्हान देण्यासाठी रजा अकादमी आणि मुस्लिम स्टुडंट्स ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
याचिकेत पोलिसांनी नोंदवलेले गुन्हे रद्द करावेत आणि अटकेस सामोरे जाणाºया युवकांची सुटका करावी, अशी मागणी केली आहे. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की शांततेत धार्मिक सण साजरा करणाऱ्या मुस्लिम समाजातील तरुणांवर अन्यायकारकपणे दंगल आणि धमकीचे आरोप लावले गेले. संविधानातील कलम 226 अंतर्गत दाखल याचिकेत पोलिस कारवाई सांप्रदायिक पूर्वग्रहांमुळे प्रेरित असल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा - PM Modi Mumbai Visit Postponed: पंतप्रधान मोदींचा मुंबई दौरा पुढे ढकलला; पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत मोदींशी चर्चा
या वादानंतर राजकीय रंगही चढला. भाजप आमदार नितेश राणे यांनी ‘I Love Mahadev’ बॅनर झळकवत प्रत्युत्तर दिले. उत्तर प्रदेश, झाशी, दावणगेरीसह मुंबई आणि छत्रपती संभाजीनगरातही अशा पोस्टर्समुळे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला. बरेलीमध्ये मौलाना तौफिक रजा यांच्या वक्तव्यांनंतर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
हेही वाचा - Russian Crude Oil Imports: रशियाकडून तेल आयात कमी करण्यास भारत सहमत; पण ट्रम्पसमोर ठेवल्या ‘या’ अटी
दरम्यान, असदुद्दीन ओवैसी यांनी या ट्रेंडला विरोध करत मुस्लिमांना प्रॉफेट मोहम्मदवरील श्रद्धा व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. दुसरीकडे, राष्ट्रपतींकडे रजा अकादमीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. या प्रकरणाचा निकाल आणि न्यायालयीन सुनावणी पुढील काही दिवसांत महत्वाची ठरणार आहे.