नवी दिल्ली: वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. NEET UG 2026 (National Eligibility cum Entrance Test, Undergraduate) ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली असून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.neet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2026 निश्चित करण्यात आली आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जाऊन “Registration for NEET UG 2026” या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर स्वतःची नोंदणी (Registration) पूर्ण करून अर्ज फॉर्म भरावा. सर्व तपशील अचूक भरल्यानंतर फॉर्म सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर Confirmation Page डाउनलोड करून त्याची प्रिंटआउट भविष्यातील वापरासाठी जतन करून ठेवावी.
हेही वाचा: Food Poisoning : मध्यान्ह भोजन खाल्ल्याने 70 हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा; एकाची प्रकृती गंभीर
अर्ज शुल्काबाबतही महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. सामान्य (General) प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1700 रुपये आहे. General EWS आणि OBC-NCL उमेदवारांसाठी 1600 रुपये शुल्क आकारले जाईल. SC, ST, PwBD आणि Third Gender उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये ठेवण्यात आले आहे. परदेशी (Foreign) उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 9500 रुपये आहे.
परीक्षेची तारीख देखील निश्चित करण्यात आली आहे. अधिकृत माहितीनुसार NEET UG 2026 परीक्षा 3 मे 2026 रोजी आयोजित केली जाणार आहे. परीक्षेची एकूण कालावधी 180 मिनिटे (तीन तास) असेल. परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होऊन सायंकाळी पाच वाजता समाप्त होईल.
उमेदवारांनी सर्व सूचना काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा. तसेच पुढील अपडेट्स, Admit Card, परीक्षा केंद्राची माहिती आणि इतर महत्त्वाच्या सूचनांसाठी अधिकृत वेबसाइटला नियमित भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील करिअरची दिशा ठरवणारी ही महत्त्वाची परीक्षा असल्याने वेळेत आणि अचूक अर्ज करणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा: Sunil Gavaskar Warning: विजयानंतरही सुनील गावस्कर संतापले; टीम इंडियाला दिला 'हा' कडक इशारा, म्हणाले 'जर हे दुर्लक्ष केलं तर...'