Tuesday, November 18, 2025 03:49:59 AM

India to Open Embassy in Kabul : तालिबानबाबत नवी दिल्लीचा मोठा निर्णय! भारत काबूलमध्ये उघडणार दूतावास केंद्र

ही घोषणा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान केली.

india to open embassy in kabul  तालिबानबाबत नवी दिल्लीचा मोठा निर्णय भारत काबूलमध्ये उघडणार दूतावास केंद्र

India to Open Embassy in Kabul: भारताने अफगाणिस्तानची राजधानी काबूल मध्ये दूतावास उघडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. ही घोषणा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री अमीर खान मुताकी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान केली. या भेटीदरम्यान जयशंकर यांनी अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला पूर्ण पाठिंबा व्यक्त केला, जो 2021 नंतर भारताकडून पहिल्यांदाच झाला आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी म्हटलं की, 'भारताने नेहमीच अफगाणिस्तानला पाठिंबा दिला आहे. अफगाणिस्तान आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. अलीकडेच त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्हाला पाठिंबा दिला होता. तसेच पहलागाम हल्ल्याचा निषेध केला होता.' सध्या, अफगाणिस्तानात रशिया आणि पाकिस्तान सारख्या देशांचेच दूतावास आहेत. भारताचे काबूलमधील उच्चायुक्तालय आता दूतावासात रूपांतरित केले जाणार आहे. तालिबान सत्ता मिळाल्यानंतर भारताने शांत धोरण अवलंबले होते. पंरतु, आता संपूर्ण राजनैतिक आणि विकासात्मक सहकार्य सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा - Pakistan Attack Kabul: तालिबान-पाकिस्तान संबंधात तणाव! काबूलमध्ये पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात TTP प्रमुख नूर वली मेहसूदचा मृत्यू

दरम्यान, एस. जयशंकर यांनी सांगितले की, भारत अफगाणिस्तानात विकास आणि मानवतावादी मदतीचे काम सुरू ठेवेल. तसेच भारत पूर्वी जाहीर केलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास तयार आहे. तसेच, भारताने 20 रुग्णवाहिका अफगाणिस्तानला देण्याची घोषणा केली आहे. 

हेही वाचा - Qatar Airways: शाकाहारी जेवण न मिळाल्याने विमान प्रवाशाचा मृत्यू; कतार एअरवेजविरोधात 1.15 कोटींचा दावा

तथापी, अफगाण परराष्ट्र मंत्री मुताकी म्हणाले की, 'भारत नेहमीच अफगाणिस्तानच्या जनतेसोबत उभा राहिला आहे. तो आमच्या देशाविरोधात कोणताही कट रचू देणार नाही. दोन्ही देशांनी सीमापार दहशतवादावरील चर्चा केली.' मुताकी हे तालिबान राजवटीचे पहिले परराष्ट्र मंत्री आहेत, ज्यांनी नवी दिल्लीला भेट दिली. त्यांनी येण्यापूर्वी तालिबान नेता अखुंझादा यांची भेट घेतली होती.


सम्बन्धित सामग्री