Saturday, February 08, 2025 05:20:07 PM

Nita Ambani's royal look at dinner wit Trump
200 वर्ष जुना नेकलेस, कांचीपूरम साडी… ट्रम्पसोबत डिनरमध्ये नीता अंबानींचा रॉयल लुक

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत एक खास डिनर आयोजित करण्यात आले होते. या संधीवर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी उपस्थिती दर्शवली

200 वर्ष जुना नेकलेस कांचीपूरम साडी… ट्रम्पसोबत डिनरमध्ये नीता अंबानींचा रॉयल लुक

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेत एक खास डिनर आयोजित करण्यात आले होते. या संधीवर रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांनी उपस्थिती दर्शवली आणि त्यांच्या रॉयल लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

नीता अंबानींनी कांचीपूरम सिल्क साडी परिधान केली होती, जी भारतीय पारंपरिक शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. कांचीपूरमच्या भव्य मंदीरांमधून प्रेरित होऊन या साडीचे डिझाइन करण्यात आले होते. विशेषतः या साडीमध्ये १०० हून अधिक पारंपरिक नमुने आहेत, ज्याचा शोध घेऊन त्याचा तयार करण्यात आले. या साडीला नीता अंबानींनी ब्लॅक फ्लोरल स्लीव्ह ब्लाउजसोबत पेयर केले, जो प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केला होता.

तसेच, नीता अंबानींनी 200 वर्ष जुन्या एका अद्वितीय नेकलेसचा उपयोग केला. या नेकलेसमध्ये पन्ना, माणिक, हीरे आणि मोत्यांचा समावेश होता आणि त्यावर लाल व हिरव्या रंगाच्या इनेमलसह कुंदन काम केले गेले होते. हे नेकलेस नीता अंबानीच्या लुकला पूर्णत्व प्रदान करत होते. त्याचसोबत त्यांनी मेचिंग फिंगर रिंग आणि इयरिंग्स देखील घातले होते.

नीता अंबानींचा मेकअप देखील अत्यंत साधा आणि आकर्षक होता. त्यांनी विंग्ड आयलाइनर, न्यूड लिप शेड, आणि मिनिमल मेकअप वापरला होता. त्यांचा हेअर स्टाइल ‘बन’ लुकमध्ये पूर्ण झाली होती. तर मुकेश अंबानी यांनी देखील या डिनरमध्ये फॉर्मल ब्लॅक ब्लेझर, व्हाइट शर्ट आणि डार्क टाय घालून परफेक्ट लुक दिला.या डिनरमध्ये डोनाल्ड ट्रम्पसोबत भेट घेणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये एलन मस्क, टिम कुक, मार्क झुकरबर्ग, जेफ बेजोस यांसारखे नामांकित उद्योगपती होते.

👉👉 जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.


सम्बन्धित सामग्री