Non-Programmable Calculator: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बोर्ड लवकरच त्यांना काही पेपर्समध्ये कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देऊ शकते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ही सुविधा लागू करण्याचा विचार करत आहे. रिपोर्ट्सनुसार, सीबीएसई बारावीच्या विद्यार्थ्यांना पेपरमधील लांबलचक गणिते लक्षात घेऊन बेसिक नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्याची परवानगी देण्याची योजना आखत आहे.
कॅल्क्युलेटरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे जाही करण्यात येणार -
बारावीच्या अकाउंटन्सी परीक्षेत बेसिक नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी देण्याचा प्रस्ताव सीबीएसई विचारात घेत आहे, जेणेकरून लांबलचक गणितांच्या समस्या कमी होतील. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. परीक्षेत एकसमानता सुनिश्चित करण्यासाठी कॅल्क्युलेटरच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एक पॅनेल स्थापन केली जाणार आहे.
हेही वाचा - India's Total Toll Collections: टोल प्लाझाच्या कमाईचा नवा विक्रम! 5 वर्षात 1.93 लाख कोटी रुपयांचा टोलवसुल
दरम्यान, बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बोर्डाच्या अभ्यासक्रम समितीने प्रस्तावित केले होते की बारावीच्या अकाउंटन्सी परीक्षेत मूलभूत, नॉन-प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर वापरण्यास परवानगी दिली जावी, जे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि टक्केवारी गणना यासारख्या आर्थिक गणनांसाठी आवश्यक असलेल्या कार्यांपुरते मर्यादित असतील. एकरूपता सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रगत किंवा प्रोग्राम करण्यायोग्य उपकरणांचा वापर रोखण्यासाठी स्वीकार्य कॅल्क्युलेटर मॉडेल्सबाबत स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एक पॅनेल तयार केले जाईल. अभ्यासक्रम समितीने असा युक्तिवाद केला आहे की, यामुळे विद्यार्थ्यांना विश्लेषणात्मक प्रतिसाद आणि केस स्टडी असाइनमेंटसाठी अधिक वेळ देता येईल.
हेही वाचा - खासदारांचे वेतन आणि पेन्शन वाढ – केंद्र सरकारचा मोठा निर्णय
अभ्यासक्रम समितीचा युक्तीवाद -
तथापि, अभ्यासक्रम समितीने असा युक्तिवादही केला आहे की, कॅल्क्युलेटरला परवानगी दिल्याने विद्यार्थ्यांवरील लांबलचक गणितांमुळे होणारा ताण आणि ओझे कमी होईल. तसेच परीक्षेतील त्यांची कामगिरी सुधारेल. यामुळे मंडळाचे उद्दिष्ट विश्लेषणात्मक प्रतिसाद वाढवणे, आंतरराष्ट्रीय मानकांशी स्पर्धा करणे आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP) च्या संदर्भात चांगल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करणे आहे.
मार्किंग सिस्टीममध्येही होऊ शकतो बदल -
याशिवाय, बोर्डाने बैठकीत काही इतर प्रमुख प्रस्तावांवरही चर्चा केली. ज्यामध्ये लहान विषयांसाठी ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणाली राबवणे आणि बोर्ड परीक्षांमध्ये नवीन पुनर्मूल्यांकन प्रक्रिया लागू करणे समाविष्ट आहे. मंडळाने म्हटले आहे की, 'मूल्यांकन केंद्रांवर उत्तरपत्रिका प्रत्यक्ष पाठविण्यास लागणारा वेळ कमी करण्यासाठी, मंडळाच्या परीक्षा समितीने ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामध्ये डिजिटल मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिका स्कॅन करणे आणि अपलोड करणे समाविष्ट असेल. या निर्णयामुळे जलद आणि अधिक कार्यक्षम मूल्यांकन प्रक्रिया सुनिश्चित होईल.