Tuesday, November 18, 2025 09:15:12 PM

Seed Processing Revolution: केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते ‘सीड मॅनेजमेंट 2.0’ चा शुभारंभ; बोगस बियाण्यांना बसणार आळा

पूसा आणि 5 ठिकाणी NSC चे नवीन बियाणे प्रक्रिया प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी Seed Management 2.0 आणि ऑनलाइन बुकिंग सिस्टमचा शुभारंभ संपन्न झाला.

seed processing revolution केंद्रीय कृषिमंत्री शिवराज चौहान यांच्या हस्ते ‘सीड मॅनेजमेंट 20’ चा शुभारंभ  बोगस बियाण्यांना बसणार आळा

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सोमवारी नवी दिल्लीतील पूसा संकुलात राष्ट्रीय बियाणे महामंडळ (National Seed Corporation, NSC) च्या अत्याधुनिक भाजीपाला व फुलबियाणे प्रक्रिया प्रकल्प आणि पॅकिंग युनिटचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमात बरेली, धारवाड, हसन, सूरतगढ आणि रायचूर येथील NSC च्या पाच बियाणे प्रक्रिया प्रकल्पांचेही त्यांनी वर्च्युअल उद्घाटन केले.

पूसा येथे उभारण्यात आलेल्या भाजीपाला बियाणे प्रक्रिया प्रकल्पाची क्षमता प्रतितास 1 टन इतकी आहे. तर इतर पाचही केंद्रांमध्ये प्रतितास 4 टन बियाणे प्रक्रिया करण्याची आधुनिक क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून, शेतकऱ्यांना उच्च गुणवत्ता असलेली बियाणे वेळेत व सहज उपलब्ध करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पायाभरणी ठरेल. यामुळे देशातील बियाणे उत्पादनाची दर्जात्मक उंची वाढण्यास हातभार लागणार आहे.

हेही वाचा: Cyclone Montha Update : आंध्र प्रदेशात भूस्खलनाची शक्यता; तामिळनाडू, ओडिशामध्येही मुसळधार पावसाचा इशारा

कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांसाठी ‘सीड मॅनेजमेंट 2.0’ प्रणाली आणि ऑनलाईन बियाणे बुकिंग प्लॅटफॉर्म चेही शुभारंभ केला. या नवीन प्रणालीद्वारे शेतकरी आपल्या बियाण्यांच्या गरजा थेट ऑनलाईन पद्धतीने बुक करू शकतील, ज्यामुळे उपलब्धता आणि वितरण प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल. “लहान शेतकऱ्यांपर्यंत उच्च प्रतीची बियाणे पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, नव्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांना उच्च दर्जाच्या बियाण्यांची सहज उपलब्धता होऊन कृषी उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. अलीकडे राबविण्यात आलेल्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ दरम्यान सर्वाधिक तक्रारी नकली आणि हलक्या प्रतीच्या बियाण्यांबाबत आल्या होत्या. त्यामुळे उत्कृष्ट बियाणे वितरणात NSC ची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारकडून दर्जाहीन बियाणे विक्रीवर कठोर कारवाई होत असल्याचीही माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय बियाणे महामंडळाच्या कृतिशीलतेचे कौतुक करत त्यांनी म्हटले की, “ही पुढाकार आत्मनिर्भर कृषी प्रणालीकडे जाणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. महामंडळाचे काम केवळ उपजीविका पुरवणे नाही, तर देशाचे अन्नधान्य भांडार समृद्ध करणे हेही आहे.”

शिवराज सिंह चौहान यांनी पुढे सुचविले की, NSC ने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी प्रादेशिक भाषांमध्ये सेवा उपलब्ध करून देत सातत्याने नवनिर्मिती करावी. “खाजगी कंपन्या महत्त्वाच्या असल्या तरी सार्वजनिक महामंडळांचे योगदान वेगळ्या स्तराचे आहे. राज्य बियाणे विकास महामंडळांची कामगिरीही अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. सर्व बाबी लक्षात घेऊन NSC ने स्पष्ट रोडमॅपसह पुढे वाटचाल करावी,” असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा:Rajnath Singh: 'सीमेवर तत्परता वाढवा, कोणत्याही वेळी युद्ध शक्य'; संरक्षणमंत्र्यांचा सैन्य दलांना सूचक इशारा


सम्बन्धित सामग्री