Friday, March 21, 2025 08:50:58 AM

Delhi Election Results 2025:दिल्लीत पुन्हा एकदा काँग्रेसचा दारुण पराभव

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे.

delhi election results 2025दिल्लीत पुन्हा एकदा काँग्रेसचा दारुण पराभव

दिल्ली : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने स्वत: झेंडा फडकवला आहे. गेल्या तीन विधानसभा निवडणुकीत आपने बाजी मारली होती. मात्र यावेळी भाजपाने आपचा पराभव करून दिल्ली काबीज केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सुरूवातीपासूनच भाजपा विरुद्ध आप अशी लढत होती. या लढाईत तिसरा पक्ष हा काँग्रेस होता. काँग्रेसचा पराभव तर निवडणुक होण्याआधीच जाहीर झाला होता. मुळातच काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवायचा नव्हता तर त्यांना आपचा पराभव करायचा होता. याबद्दल काँग्रेसच्या काही नेत्यांनीही कबुली दिली आहे. 

दिल्लीत पुन्हा एकदा काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत काँग्रेसला एकही जागा मिळवता आली नाही. दिल्ली विधानसभेत काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. काँग्रेसचा अजून एकही उमेदवार विजयी नाही. काँग्रेस जिंकण्यापेक्षा आपचा पराभव करण्यासाठी या निवडणुकीत उतरली होती.  दिल्ली विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. ज्यांना राजकारणात रस आहे अशा सगळ्यांनाच दिल्लीत कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्त्वाचे वाटतं होते.  


हेही वाचा : Delhi Election Results 2025: दिल्लीत भाजपाची मुसंडी

तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपाची सत्ता आली आहे. त्यामुळे याआधी सलग तीन टर्म दिल्लीत स्वत:च अस्तित्व निर्माण करणाऱ्या आपला या निवडणुकीत पराभव सहन करावा लागत आहे. तर काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. मात्र तरीही काँग्रेस समाधानी असल्याचे चित्र आहे. कारण आम आदमी पार्टीचा पराभव झाला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतरही काँग्रेस अंतर्गत स्तरावर समाधानी असल्याचे दिसून येते. इतकेच नाही तर मतमोजणीदरम्यान अलका लांबा यांसारख्या नेत्यांनीही हे उघडपणे व्यक्त केले. संदीप दीक्षित यांनीही यासंदर्भात असेच मत व्यक्त आहे. पण यामागील मुख्य कारण काय आहे, हे बारकाईने समजून घ्यायला हवे.
2013 नंतर काँग्रेस सत्ता ढासळली आणि आपची सत्ता आली. काँग्रेसची वोट बँक आपने बळकावली. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला आपला पराभूत करणे महत्त्वाचे वाटत होते. काँग्रेसची मुस्लिम मतेही आपकडे गेली. त्यामुळे दिल्लीतील आपचा पराभव म्हणजे काँग्रेससाठी भविष्यातील संधी निर्माण होतील असं म्हणणं वावग ठरणार नाही.   


सम्बन्धित सामग्री