Thursday, January 22, 2026 04:16:51 AM

Amit Shah On Rahul Gandhi: 'संसद तुमच्या आदेशांवर चालणार नाही...'; अमित शाह यांचा राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा

शाह यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी हरियाणामधील निवडणूक अनियमिततेसंदर्भात खोटे आरोप केले, पत्रकार परिषदेत चुकीची माहिती दिली

amit shah on rahul gandhi संसद तुमच्या आदेशांवर चालणार नाही अमित शाह यांचा राहुल गांधींना कडक शब्दांत इशारा

Amit Shah On Rahul Gandhi: निवडणूक सुधारणांवर आज लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात जोरदार वाद झाला. विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना शहा यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला केला आणि विविध निवडणूक अनियमिततेचे उदाहरणे सांगितले. शाह यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, त्यांनी हरियाणामधील निवडणूक अनियमिततेसंदर्भात खोटे आरोप केले, पत्रकार परिषदेत चुकीची माहिती दिली आणि मतचोरीचा खोटा मुद्दा उपस्थित केला. यावर राहुल गांधींनी शहा यांना सामोरे जात “मी तुम्हाला त्या पीसीवर आव्हान देतो” असे म्हटले. 

नेहरू मत चोरीद्वारे देशाचे पहिले पंतप्रधान झाले - अमित शाह

उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये मते कशी चोरी झाली याचे उत्तर देण्याची मागणी राहुल यांनी केली. यामुळे संसदेत गोंधळ उडाला. दरम्यान, यावर गृहमंत्री अमित शाह यांनी या चर्चेवर संताप व्यक्त करत म्हटले, “संसद तुमच्या आदेशांवर चालणार नाही. काय बोलायचे ते मी ठरवेन.” त्यांनी मतदार असणे आणि मतचोर असण्यामध्ये फरक स्पष्ट केला आणि इतिहासातील काही उदाहरणे सांगितली. शहा यांनी म्हटले की स्वातंत्र्यानंतर मतदान चोरीची पहिली घटना सरदार पटेल यांची 28 मते, तर नेहरूंची 2 मते खोटी होती, आणि नेहरू मत चोरीद्वारे देशाचे पहिले पंतप्रधान झाले.

हेही वाचा - EVM Controversy: 'पंतप्रधान मोदी EVM हॅक करत नाहीत, तर ते...'; कंगना रणौत लोकसभेत नेमंक काय म्हणाली?

तथापी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, इंदिरा गांधी रायबरेलीमधून निवडून आल्या. राज नारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात जाऊन युक्तिवाद केला की निवडणूक नियमांनुसार झाली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की निवडणूक निष्पक्षपणे जिंकली गेली नाही आणि म्हणून ती रद्द करावी. या मतदान चोरीला झाकण्यासाठी संसदेत एक कायदा मंजूर करण्यात आला ज्यामुळे पंतप्रधानांवर कोणताही खटला दाखल करता येत नाही.

हेही वाचा - Shashi Tharoor: शशी थरूर यांचा वीर सावरकर पुरस्कार स्वीकारण्यास नकार; आयोजकांवर टीका करत म्हणाले, 'मला कोणतीही...

दरम्यान, अमित शाह यांनी काँग्रेसच्या निवडणूक सुधारणा प्रक्रियेवर टीका करत म्हटले की, 2014 नंतर काँग्रेसने निवडणूक सुधारणांवर कोणत्याही सूचना दिल्या नाहीत आणि निवडणुका हरल्यावरच विरोधक आरोप करतात. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेवर भर देत सांगितले की, 2004 व 2009 मध्ये काँग्रेसने ईव्हीएम वापरून विजय मिळवला होता, त्यामुळे विरोधकांचे आरोप अस्वस्थता निर्माण करण्यासाठी आहेत. संसदेतील हा वाद निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि इतिहासातील घटनांबाबत चर्चेची दिशा अधोरेखित करतो. 


सम्बन्धित सामग्री